एक्स्प्लोर

राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीतही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेची एकी दिसणार

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना मुंबई महापालिकेत आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी शिवसेना ताकद लावणार आहे. त्यांच्याबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष देखील एकत्र असणार आहेत.

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर विविध स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीतही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात येणाऱ्या महापालिका निवडणुका महाविकास आघाडी सरकारसाठी महत्वाच्या आहेत. थोड्याच महिन्यात नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काही नगरसेवक जे भाजपत गेले ते परत येण्यास सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी सरकार आणि विशेषतः शिवसेनेला सगळ्यात महत्वाची असणारी महापालिका म्हणजे मुंबई महापालिका. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना मुंबई महापालिकेत आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी शिवसेना ताकद लावणार आहे. त्यांच्याबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष देखील एकत्र असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष मुंबईत कधीच वाढला नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे मैत्रीचे संबंध पाहता मुंबईत राष्ट्रवादीने कधीच ताकद वाढवली नाही. किंबहुना राज्यात आघाडी सरकार सत्तेत आणि मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता अबाधित असणं हे देखील समीकरण राहिलंच आहे. राष्ट्रवादीची देखील जोमाने तयारी मुंबईत राष्ट्रवादीचे मोठे चेहरे म्हणजे सचिन अहिर, नवाब मलिक, संजय दीना पाटील. 2019 विधानसभा निवडणुकीआधी सचिन अहिर यांनी तर मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर असताना शिवसेनेत प्रवेश केला. नंतर संजय दिना पाटील यांनीही साथ सोडली. नवाब मलिक यांना मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली आणि त्यांनी आपली जागा निवडून आणली. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार नवाब मलिक आहेत. अशा वेळी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढवत असताना राष्ट्रवादी पक्षाला जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. आतापर्यंत मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त 14 तर कमीत कमीत 9 नगरसेवक निवडून आले होते. मुंबई महापालिका हा महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने तिन्ही पक्षांना मेहनत घ्यावी लागणार आहे. 2017 मध्ये राज्यात युतीचं सरकार असतानाही मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं भाजपशी युती तोडली आणि स्वबळावर निवडणूक लढवली. या निवडणुकीत भाजपने मुंबईत मोठ्या प्रमाणावर मुसंडी मारली. शिवसेनेसाठी ही तेव्हाच धोक्याची घंटा होती. त्यामुळे 2022 ला होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला आपली सत्ता अबाधित ठेवावी लागेल आणि त्यासाठी मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाही मदत करावी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या निमित्ताने मुंबईत एक मार्च रोजी विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत पक्ष उभारण्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. राष्ट्रवादी पक्षात मुंबईत मोठे चेहरे नाहीत तसेच कार्यकर्त्यांची फळी नाही. महाविकास आघाडीत जागा वाटपात ज्या जागा मिळतील, त्या जागांवर जिंकून येणारे उमेदवार शोधावे लागतील. मुंबईत नेत्यांची फळी उभी करावी लागेल. त्यासाठी आतापासून तयारी केली तर मुंबई महापालिकेत पक्षाला उभारी मिळू शकेल. त्यामुळे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या या एकदिवसीय शिबिरानंतर पक्ष मुंबईत उभा राहील का आणि निवडणुकीत त्याची ताकद किती दिसेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

महत्त्वाच्या बातम्या

एल निनोमुळं पर्जन्‍यमानात घट; पाण्याची आवर्तने तात्काळ बंद करा, जलसंपदा विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
एल निनोमुळं पर्जन्‍यमानात घट; पाण्याची आवर्तने तात्काळ बंद करा, जलसंपदा विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
अंधेरीत जाहिरात फलकांना अडथळा, 63 झाडांच्या फांद्याची छाटणी, आशिष शेलार आक्रमक, संबंधित कंपनीवर FIR दाखल करण्याचे निर्देश
अंधेरीत जाहिरात फलकांना अडथळा, 63 झाडांच्या फांद्याची छाटणी, आशिष शेलार आक्रमक, संबंधित कंपनीवर FIR दाखल करण्याचे निर्देश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जून 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जून 2026 | शनिवार
राज्यात तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका; मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले, मी त्यांना फोन केला
राज्यात तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका; मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले, मी त्यांना फोन केला

व्हिडीओ

Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव
Women Power : महिलांनी घेतला निर्धार अन् बदललं गावाचं चित्र; 'महिला शक्ती कमांडो'ची यशोगाथा | Special Report
Jamun & Drought : जांभळाचा सडा आणि दुष्काळाचा इशारा? निसर्ग काय सांगतोय? | Special Report
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Afghanistan, 1st ODI: टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
Rohit Sharma Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून आला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून परतला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
India vs Afghanistan, 1st ODI: अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
मन हेलावणारी घटना, घरातून सांगून निघाले, दूधसागर नदीपात्रात बुडून चार जणांचा मृत्यू; तीन सख्ख्या भावांचा समावेश
मन हेलावणारी घटना, घरातून सांगून निघाले, दूधसागर नदीपात्रात बुडून चार जणांचा मृत्यू; तीन सख्ख्या भावांचा समावेश
Rahmanullah Gurbaz: अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक
अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक
Embed widget