एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना-मनसे एकत्र येण्याची चिन्ह
कल्याण: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती तोडल्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये नवीन राजकीय समीकरणं उदयास येतं आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची चिन्ह आहेत.
भाजपला दूर ठेवण्यासाठी कल्याण-डोंबिवलीमधील शिवसेना आणि मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता दोन्ही पक्षांचे नेते काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील महिला आणि बालकल्याण समिती, परिवहन समिती आणि उपमहापौर पदासाठी काल निवडणुका होणार होत्या. मात्र, एकही उमेदवारी अर्ज न आल्यामुळं निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
जर महापालिकेत शिवसेना आणि मनसे एकत्र आली तर मॅजिक फिगर गाठत भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं सहज शक्य आहे. त्यामुळे आता कल्याण-डोंबिवलीत नेमकं काय घडणार याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेने सर्वाधिक ५२ जागांवर विजय मिळवला आहे. मात्र सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेले एकहाती बहुमत त्यांना मिळवता आलेले नाही. १२२ जागा असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत ६२ ही मॅजिक फिगर आहे. त्यामुळे शिवसेनेनं मनसेला सोबत घेतल्यास भाजपला विरोधी पक्षात बसावं लागू शकतं.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल:
- शिवसेना 52
- भाजप 42
- मनसे 9
- काँग्रेस 4
- राष्ट्रवादी 2
एकूण जागा: 122
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
भारत
राजकारण
Advertisement