एक्स्प्लोर

अमरावतीसारख्या घटना होऊ नयेत म्हणून, विरोधी पक्षनेत्यांनी आगीत तेल ओतू नये : संजय राऊत

Sanjay Raut on Amravati Voilance : रझा अकादमीवर बंदी घालण्यासंदर्भात राज्य सरकार, गृहखातं निर्णय घेईल असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut on Amravati Voilance : अमरावतीतील वातावरण निवळलेलं असताना पुन्हा आगीत तेल ओतू नये, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. रझा अकादमीवर बंदी घालण्यासंदर्भात राज्य सरकार, गृहखातं निर्णय घेईल असंही संजय राऊत म्हणाले आहेत. 

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "कायदेशीर कारवाई करताना गट, तट, पक्ष पाहिला जात नाही. एकेकाळी विरोधी पक्षनेतेही राज्याचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात अमरावतीसारख्या घटना घडू नयेत, यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी आगीत तेल न टाकता, ते शांत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अमरावतीसारख्या घटनांचं राजकारण, पेटवापेटवी ही महाराष्ट्राला परवडणारी नाही. महाराष्ट्र हा दंगलींसाठी ओळखला जाऊ नये. महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे. आपण पाहिलं असेल त्याच अमरावतीच्या बाजूला पुढे विदर्भात, गडचिरोलीत, याच पोलिसांनी, याच सरकारनं 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. कायद्यापुढं सगळे समान आहेत. अमरावतीत दंगल कोणी पेटवली? कोणत्या कारणानं पेटवली? हे देशालाही माहीती आहे, राज्याच्या गृहमंत्र्यांनाही माहीत आहे आणि अमरावतीच्या जनतेलाही माहीत आहे. वातावरण सगळं शांत झालं असताना, उगाचंचं काड्या करणारं काम कोणीही करु नये, एवढंच मी त्यांना आमच्या पक्षातर्फे आणि महाविकास आघाडीतर्फे आवाहन करिन."

"इंटलिजंस कधी-कधी फेल होतं. शेवटी ती माणसचं आहेत. देशभरात अनेक घटनांच्या संदर्भात इंटलिजेंस फेल होतं. काश्मीरमध्ये होतं, त्रिपुरामध्ये होतं. तरिसुद्ध दंगल राज्याची, अमरावतीची दंगल नियंत्रणात आणली. आज अमरावतीत शांतता नांदतेय, हे महत्त्वाचं." , असं  संयज राऊत म्हणाले.

अजूनही भाजप अमरावतीच्या बाबतीत आक्रमक असल्याचं पाहायला मिळतं असं विचारल्यावर, ते आक्रमक आहेत, म्हणजे, त्यांना काय परत दंगल करायची आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. "कशाकरता आंदोलन करत आहेत, काय आहे? महागाई विरोधात आंदोलन करतायत? की, चीन लडाखमध्ये घुसल्यामुळे आंदोलन करत आहेत. कशासाठी आंदोलन करत आहेत, त्यांनी सांगावं.", असंही संजय राऊत म्हणाले. 

हिंमत असेल तर रझा अकादमीवर बंदी घाला, असं भाजपच्या वतीनं सांगण्यात येत आहे. त्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "तुम्ही का नाही घातली बंदी? तुमच्या काळातही काही प्रकार घडले होते. राज्य सरकार कायद्याच्या संदर्भात कुठेही नमतं घेत नाही. काय करायचं आहे? ते गृहमंत्री पाहण्यास सक्षम आहेत." पुढे बोलताना ते म्हणाले की, "भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर गुन्हे दाखल होणं, म्हणजे, हिंदूंवर गुन्हे दाखल होत आहेत, असं म्हणणं चुकीचं आहे. जे दंगलखोर आहेत. ज्यांनी अमरावती पेटवली. ज्यांनी जनतेचं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं, ते कुणीही असू देत. ते एकाच पक्षाचे आहेत, म्हणजे, ते हिंदू किंवा मुस्लिम आहेत, असं होत नाही." 

महत्त्वाच्या बातम्या

Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Netflix Top Trending Movie: आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
Embed widget