पंढरपुरात शिवसैनिकांची मुख्यमंत्री, रावसाहेब दानवेंविरोधात घोषणाबाजी
उद्धव ठाकरे राममंदिर, कर्जमाफी अशा विविध मुद्द्यावर काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष आहे. मात्र युतीच्या मुद्द्यावर काय बोलणार याची उत्सुकता शिवसैनिकांमध्ये आहे. मात्र शिवसैनिकांनी केलेल्या घोषणाबाजीवरुन शिवसैनिक युतीसाठी उत्सुक नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
पंढरपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पंढरपूर दौऱ्याआधी शिवसैनिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. राम मंदिर बांधण्याची मागणीही यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या शिवसैनिकांनी केली.
उद्धव ठाकरे राम मंदिर, कर्जमाफी अशा विविध मुद्द्यावर काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष आहे. मात्र युतीच्या मुद्द्यावर काय बोलणार याची जास्त उत्सुकता शिवसैनिकांमध्ये आहे. मात्र घोषणाबाजीवरुन शिवसैनिक युतीसाठी उत्सुक नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
'रावसाहेब दानवे यांचं करायचं काय, खाली डोके वर पाय', 'राम मंदिर झालंच पाहिजे' अशी घोषणाबाजी स्थानिक शिवसैनिकांनी यावेळी केली.
पंढरपूरात शिवसैनिकांची मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि रावसाहेब दानवेंच्या विरोधात घोषणाबाजी @abpmajhatv pic.twitter.com/abLgS2DABu
— Vaibhav Suresh Parab (@vaibhavparab21) December 24, 2018
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पंढरपूर भगवेमय झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अयोध्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा महत्वाचा दौरा मानला जात आहे. पंढरपूरमध्ये उद्धव यांची सभाही होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या सभेमध्ये काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे.
संंबंधित बातम्या