एक्स्प्लोर
मुंबई विमानतळावर शिवशाही, शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. तिथीनुसार शिवसेनेकडून आज शिवजयंती साजरी केली जाते.
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज शिवशाही अवतरणार आहे. विमानतळ परिसरात असलेल्या शिवरायांच्या पुतळ्यासमोर शिवजयंती सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुतळ्याचं पूजन करण्यात येणार आहे.
पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा आहे. या पुतळ्यासमोर रायगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. एका बाजूला महाराजांची मेघडंबरी आणि समाधी असा भव्य सेट तयार करण्यात आला आहे. सकाळी दहा वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. तिथीनुसार शिवसेनेकडून आज शिवजयंती साजरी केली जाते.
यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित असतील. भगवे झेंडे, तुताऱ्या, ढोलताशे आणि सुमारे 100 ढोल पथकांच्या गजरात 388 व्या शिवजयंतीचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement