एक्स्प्लोर

Mumbai Mayor | मुंबई महापौर पदासाठी भाजप उमेदवार देणार नाही, सूत्रांची माहिती

राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर भाजप-शिवसेनेत सुरु असलेला सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजप महापौर निवडणुकीत काय भूमिका घेते, याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. मात्र राज्यातील सत्ता स्थापनेच्या संघर्षाचे पडसाद तूर्तास तरी मुंबई महापालिकेत उमटणार नाही.

मुंबई : मुंबई महापालिकेत महापौर पदासाठी भाजप उमेदवार देणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आज महापौर पदासाठी निवडणूक अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजप पहारेकरीच्या भूमिकेत कायम राहणार असल्याचं समोर येत आहे. सध्या राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर भाजप-शिवसेनेत सुरु असलेला सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजप महापौर निवडणुकीत काय भूमिका घेते, याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. मात्र राज्यातील सत्ता स्थापनेच्या संघर्षाचे पडसाद तूर्तास तरी मुंबई महापालिकेत उमटणार नाही.

भाजप मुंबई महापौर पदाची निवडणूक लढणार नाही. आवश्यक नगरसेवक संख्याबळ भाजपकडे नसल्याने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र 2022 ला मुंबईत भाजपचा महापौर असेल, असं भाजपचे गटनेते आणि खासदार मनोज कोटक मनोज कोटक यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस अर्ज दाखल करणार?

मात्र काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची दाट शक्यता आहे. महाशिवआघाडीच्या चर्चा सुरु असल्या तरी मुंबई महापालिकेत काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमीकेतच राहणार आहे, अशी माहिती मुंबईतील काँग्रेस नेत्यांनी दिली. आज दुपारी 3 वाजता महापालिकेत सर्व काँग्रेस नगरसेवकांना बोलावण्यात आलं आहे. दिल्ली हायकमांडने आदेश दिल्यास काँग्रेस दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे देखील घेऊ शकते, अशी माहिती आहे.

मुंबई महापालिकेत महापौर पदासाठी शिवसेनेकडून यशवंत जाधव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. महापौर पदाच्या रेसमध्ये अनेक नावं चर्चेत आहेत. यामध्ये आशिष चेंबुरकर, विशाखा राऊत, मंगेश सातमकर किशोरी पेडणेकर यांची नावं चर्चेत आहेत.

यशवंत जाधव मुंबई महापालिकेत गेले 25 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचे मागच्या वेळेला महापौर पद हुकले होते. पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हातात आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.

मंगेश सातमकर माजी शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांचीही मागील वेळेस महापौर बनण्याची संधी हुकली होती.

आशिष चेंबूरकर माजी बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर हे दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख आहेत. चेंबूरकर वरळीतील नगरसेवक आहेत. वरळीतून युवा नेते आदित्य ठाकरे यांना मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.

किशोरी पेडणेकर महिला विभाग प्रमुख किशोरी पेडणेकर यांनाही अनेक वेळा समित्यांच्या अध्यक्ष पदाने चकवा दिला आहे. आदित्य ठाकरे आमदार झाल्याने त्यांचीही महापौर पदावर वर्णी लागू शकते.

शेखर वायंगणकर मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रभागात शेखर वायंगणकर हे सेना नेते अनिल परब व महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या जवळचे नगरसेवक आहेत.

विशाखा राऊत सभागृह नेत्या आणि माजी आमदार विशाखा राऊत यांना महापौर बनवून त्यांच्या जागी माजी महापौर श्रद्धा जाधव यांना सभागृह नेता बनवले जाईल अशी चर्चाही महापालिकेत आहे.

कशी होईल महापौर पदाची निवडणूक

मुंबई शहराचे महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. खुल्या प्रवर्गातून कोणताही महिला किंवा पुरुष नगरसेवक महापौर होऊ शकत असल्याने महापौर पदासाठी इच्छुक नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. या पदासाठी येत्या 22 नोव्हेंबरला निवडणूक होत आहे तर 18 नोव्हेंबर ही महापौरपदाची उमेदवारी भरण्यासाठीची अंतिम तारीख आहे. 2017 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणूकीनंतर भाजपनं 83 नगरसेवकांसह पहारेक-याची भूमीका स्विकारली. शिवसेनेकडे सर्व समित्यांची अध्यक्षपदे आणि महापौरपदही आले. मात्र,आता पुढील अडीच वर्षांसाठी निवडल्या जाणा-या महापौरपदाच्या निवडणूकीत भाजप ही पहारेक-याची भूमीका सोडेल का यावर सर्वांचं लक्ष आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरण; गुंड गजा मारणेची जेलमध्ये रवानगी, पुणे पोलिसांकडून मकोका
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरण; गुंड गजा मारणेची जेलमध्ये रवानगी, पुणे पोलिसांकडून मकोका
Nashik Bajar Samiti : नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळेंविरोधात अविश्वास ठराव, पिंगळेंचे गिरीश महाजनांवर गंभीर आरोप, म्हणाले, ते पालकमंत्री होणार असल्यानेच... 
नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळेंविरोधात अविश्वास ठराव, पिंगळेंचे गिरीश महाजनांवर गंभीर आरोप, म्हणाले, ते पालकमंत्री होणार असल्यानेच... 
Dhananjay Munde: मंत्री धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात धाव; कोर्टाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देणार,नेमकं प्रकरण काय?
मंत्री धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात धाव; कोर्टाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देणार,नेमकं प्रकरण काय?
Sangli News : कर्जाचा डोंगर, उसनवारीचा पैसा फेडण्याचे टेन्शन, विम्याच्या पैशावर वळली नजर; बायकोने मुलाच्या मदतीने थेट नवऱ्याला संपवलं, पहिल्यांदा रचला अपघाताचा बनाव!
कर्जाचा डोंगर, उसनवारीचा पैसा फेडण्याचे टेन्शन, विम्याच्या पैशावर वळली नजर; बायकोने मुलाच्या मदतीने थेट नवऱ्याला संपवलं, पहिल्यांदा रचला अपघाताचा बनाव!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : कोकाटेंच्या शिक्षेवरुन दावनेंचा सवाल, गदारोळ होताच फडणवीस उठले अन्...Vidhan Parishad Rada : विधान परिषद सुरु होताच पहिल्याच मिनिटात राडा, पाहा UNCUT VIDEOKaruna Sharma: Dhananjay Munde यांच्या प्रेशरमुळे अजितदादा राजीनामा जाहीर करत नाही : करुणा शर्माVidhanbhavan Nana Patole PC | राज्यात लाडक्या बहिणी असुरक्षित, नाना पटोलेंची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरण; गुंड गजा मारणेची जेलमध्ये रवानगी, पुणे पोलिसांकडून मकोका
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरण; गुंड गजा मारणेची जेलमध्ये रवानगी, पुणे पोलिसांकडून मकोका
Nashik Bajar Samiti : नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळेंविरोधात अविश्वास ठराव, पिंगळेंचे गिरीश महाजनांवर गंभीर आरोप, म्हणाले, ते पालकमंत्री होणार असल्यानेच... 
नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळेंविरोधात अविश्वास ठराव, पिंगळेंचे गिरीश महाजनांवर गंभीर आरोप, म्हणाले, ते पालकमंत्री होणार असल्यानेच... 
Dhananjay Munde: मंत्री धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात धाव; कोर्टाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देणार,नेमकं प्रकरण काय?
मंत्री धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात धाव; कोर्टाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देणार,नेमकं प्रकरण काय?
Sangli News : कर्जाचा डोंगर, उसनवारीचा पैसा फेडण्याचे टेन्शन, विम्याच्या पैशावर वळली नजर; बायकोने मुलाच्या मदतीने थेट नवऱ्याला संपवलं, पहिल्यांदा रचला अपघाताचा बनाव!
कर्जाचा डोंगर, उसनवारीचा पैसा फेडण्याचे टेन्शन, विम्याच्या पैशावर वळली नजर; बायकोने मुलाच्या मदतीने थेट नवऱ्याला संपवलं, पहिल्यांदा रचला अपघाताचा बनाव!
Video: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत करुणा शर्मांची अंदर की बात; राष्ट्रवादीत गेल्यानेच माझ्या पतीचं वाटोळं झालं
Video: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत करुणा शर्मांची अंदर की बात; राष्ट्रवादीत गेल्यानेच माझ्या पतीचं वाटोळं झालं
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात ट्विस्ट, आता शिंदेसेनेच्या महिला पोलीस अधीक्षकांच्या भेटीला, नेमकी मागणी काय?
रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात ट्विस्ट, आता शिंदेसेनेच्या महिला पोलीस अधीक्षकांच्या भेटीला, नेमकी मागणी काय?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार का? नार्वेकरांच्या दालनात फडणवीस-अजितदादांसोबत बंद दाराआड चर्चा
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार का? नार्वेकरांच्या दालनात फडणवीस-अजितदादांसोबत बंद दाराआड चर्चा
इंद्रजीत सावंत यु-ट्यूबमधून चुकीची माहिती पसरवतात; करनी सेनेचा आरोप, पोलिसात तक्रार
इंद्रजीत सावंत यु-ट्यूबमधून चुकीची माहिती पसरवतात; करनी सेनेचा आरोप, पोलिसात तक्रार
Embed widget