एक्स्प्लोर

Uddhav Thackeray Protest : उद्धव ठाकरेंनी हिंदीचा शासन निर्णय टराटरा फाडला, हिंदी विरोधात शिवसैनिक एकवटले, रस्त्यावरची लढाई सुरू

Shiv Sena Protest Against Hindi : हिंदी सक्तीच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यभर शासन निर्णयाची होळी करण्यात आली. या आंदोलनात महाविकास आघाडीचे इतर घटक पक्षही सहभागी झाल्याचं दिसून आलं.

मुंबई : हिंदीच्या शासन निर्णयाविरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटल्याचं दिसून येतंय. हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राज्यभर आंदोलन करत आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ कार्यालय परिसरात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अन्य विरोधी पक्षही सहभागी झाल्याचं दिसून आलं. तसेच काही मराठी कलाकारही या आंदोलनात सहभागी झाले. 

राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत बदल करून इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने मुंबईत 5 जुलै रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे. यापूर्वी राज्यभरामध्ये तालुकास्तरावर हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करत निषेध व्यक्त करण्यात आला. 

हिंदीच्या मुद्द्यावर मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्थाची मुंबईत बैठक पार पडली. त्यानंतर शासनाच्या जीआरची होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये ठाकरेंचे शिवसैनिक, तसेच महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

Uddhav Thackeray Protest Against Hindi : दादर परिसरात बॅनरबाजी

दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडून दादरच्या शिवसेना भवन परिसरात बॅनर लावण्यात आले आहेत. 'हिंदीसक्तीच्या सरकार निर्णयाची होळी करूया, मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया’ असा मजकूर बॅनरवर लिहिला आहे.

संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "मुंबईत होणाऱ्या या आंदोलनासाठी सगळ्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. याचा पहिला टप्पा होता तो शासन निर्णयाची होळी करणे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या सरकारने जो हिंदी सक्तीचा आदेश काढला आहे त्याची होळी करण्यात येणार आहे. यात केवळ शिवसैनिक सामील नाही तर त्या त्या जिल्ह्यातील मराठी जनता, साहित्यिक, लेखक यांनाही आमंत्रित केला आहे. उद्या अधिवेशन आहे अधिवेशनात सुद्धा चर्चा मांडू."

MNS Shiv Sena Morcha Mumbai : मनसेचं बैठकीचं सत्र 

दरम्यान, 5 जुलैच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसेचं बैठकांचं सत्र सुरु आहे. मोर्चाच्या नियोजनासाठी मनसेची मुंबईतील दादरमधील मनसेच्या राजगड या कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, यशवंत किल्लेदार उपस्थित होते. तर यानंतर दक्षिण मुंबई पदाधिकाऱ्यांची मुंबई मराठी पत्रकार संघात पार पडणार आहे.  मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आलेलं आहे.

अजित पवारांचा वेगळा सूर

हिंदीच्या निर्णयाविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 5 जुलैला मुंबईत एकत्र मोर्चा काढणार आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे. हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चाची वेळच येऊ नये, असा आमचा प्रयत्न असल्याचं अजित पवार म्हणाले. चर्चेतून चांगला मार्ग निघू शकतो असं देखील अजित पवार यांनी म्हटलं. 

महत्त्वाच्या बातम्या

वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget