मुंबईतील वातावरण बिघडवण्यामागे अंडरवर्ल्ड कनेक्शन; डी गँगकडून घेतलेल्या पैशांचा वापर राणा दाम्पत्यानं कुठं केला? संजय राऊतांचा सवाल
Sanjay Raut On Navneet and Ravi Rana : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या आज पुन्हा गंभीर आरोप केले आहेत.
Sanjay Raut On Navneet and Ravi Rana : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या आज पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील वातावरण बिघडवण्यामागे अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे. डी गँगकडून घेतलेल्या पैशांचा वापर राणा दाम्पत्यानं कुठं केला? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. राऊत यांनी म्हटलं आहे की, सवाल राणा दांपत्य अचानक रामभक्त, हनुमान भक्त झाले. मुंबईत धिंगाणा घालू लागले. वातावरण बिघडवू लागले. मात्र त्यांचे डी गँगशी संबंध असल्याचं समोर येतयं. गेल्या 15 दिवसांत जे घडतंय त्यामागे डी गँगचा पैसा लागला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
अंडरवर्ल्ड कनेक्शन :
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 27, 2022
लकड़ावाला को ED ने ₹200 करोड़ के मनी लांड्रिंग केस में अरेस्ट किया था, लॉकअप में ही उसकी डेथ हो गई। यूसुफ की गैरकानूनी कमाई का हिस्सा अब भी नवनीत राणा के अकाउंट में है।तो ED कब पिलाएगी राणा को चाय?क्यों बचाया जा रहा है इस D-गैंग को? बीजेपी चूप क्यूँ हैं? pic.twitter.com/hJ1itnitlL
राऊत यांनी म्हटलं आहे की, डी गँगचा फायनान्सर लकडावालाशी राणांचे संबंध असल्याचा एक छोटासा पुरावा समोर आला आहे. हे पैसे का घेतले? हा तपासाचा भाग आहे. पण ईडी याचा तपास का करत नाही?, हा लकडावाला आधी ईओडब्ल्यूच्याच कस्टडीत होता. मग तो ईडीच्या ताब्यात गेला. मग याची चौकशी का झाली नाही? असा सवाल देखील संजय राऊतांनी केला आहे.
संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, महाविकास आघाडीच्या नेत्यांची चौकशी करतात मग याची चौकशी का करत नाहीत. ही सरळसरळ मनीलाँड्रिंगची केस आहे. आता ईओडब्ल्यू नक्की चौकशी करेल. आमची मालमत्ता जप्त केलीत, चौकशी केलीत, आमच्या नेत्यांना अटक केली. मग राणांना का अद्याप वाचवंल गेलं?, याच्या मागे कोण आहे? देवेंद्र फडणवीस आता गप्प का? इतरवेळी पोपटासारखे बोलणारे आता गप्प का बसलेत? असा सवाल त्यांनी केला आहे.
संजय पांडे यांचा महाविकास आघाडीशी संबंध असल्याच्या आरोपावर राऊत म्हणाले की, राणा यांनी पाणी मिळालं नसल्याचा आरोप केला. त्यावर मुंबई पोलिस आयुक्तांनी त्यांना चहापाणी देतानाचा व्हिडीओ व्हायरल केला. आधीचे देखील एक पोलीस आयुक्त भाजपात दाखल झाले आहेत आणि आज त्यांच्या पालख्या उचलतायत ते दिसत नाही? असं राऊत म्हणाले.