मला बोलावले नाही तरी मी आलोय! ...जेव्हा भाजपच्या कार्यक्रमात अचानक पोहोचतात शिवसेनेचे खासदार
आता सोशल डिस्टन्सिंग किती जरी असली तरी एकमेकांमध्ये डिस्टन्स ठेवू नका, असा चिमटा खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित भाजप नेत्यांना घेतला.
कल्याण : मला बोलावले नसले तरी मी आलोय. सध्या सोशल डिस्टन्सिंग कितीही असलं तरी आपल्या एकमेकांमधील डिस्टन्स वाढायला नको, असा सल्ला शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाजप आमदार व नगरसेवकांना दिला. कल्याण पूर्वेतील भाजपच्या चौक नामांतरांच्या कार्यक्रमाला अचानक खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली होती. खासदार श्रीकांत शिंदे यांना पाहून उपस्थित सर्वच आश्चर्यचकित झाले. श्रीकांत शिंदे यांनी मी याच रस्त्याने जात होतो कार्यक्रम पाहिला, नगरसेवक आमदार दिसले टाळून जाणे बरोबर वाटलं नाही, म्हनून आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
कल्याण-डोंबिवलीला जोडणारा नव्या पत्रीपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान भाजप खासदार कपिल पाटील आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात जुंपल्याचे दिसून आलं. आज भाजपकडून कल्याणच्या पत्री पुलाजवळ नवीन पूल आणि पोहोच रस्त्याला जोडणाऱ्या चौकाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नामकरण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला नगरसेविका रेखा चौधरी, भाजप आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते. हा कार्यक्रम सुरू असताना अचानक शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. भाजपच्या कार्यक्रमात आलेले पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर त्यांनी भाषण करण्यासाठी त्यांनी माईक हाती घेत मार्गदर्शन केलं.
नगरसेवकांनी मला बोलावलं नाही. मात्र मी याच रस्त्याने जात होतो यावेळी कार्यक्रम पाहिला. नगरसेवक आमदारांना पाहून मी इथे आलो. आपले सगळ्यांचे स्नेहाचे संबंध आहेत. आपला पक्ष वेगळा जरी असला तरी ऋणानूबंध जुळलेले आहेत, ते जपण्याच सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आता सोशल डिस्टन्सिंग किती जरी असली तरी एकमेकांमध्ये डिस्टन्स ठेवू नका, असा चिमटा त्यांनी उपस्थित भाजप नेत्यांना घेतला.