एक्स्प्लोर

मुंबई मनपा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार, सत्ता शिवसेनेचीच! : संजय राऊत

मुंबई महानगर पालिकेमध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सत्ता येईल असं भाकित शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलं आहे. अनेक लोक बोलले होते की हे सरकार 11 दिवस टिकणार नाही. आता बाँम्ब त्यांच्याच खाली फुटतील. आमच्याकडे सर्व तयारी झाली आहे. आता आवाज येतील, असं देखील राऊत म्हणाले.

मुंबई : मुंबई महानगर पालिकांमध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सत्ता येईल असं भाकित शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलं आहे. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, अनेक लोक बोलले होते की हे सरकार 11 दिवस टिकणार नाही. ते म्हणत होते महिन्याभरात जाईल, गणपतीला जाईल आता दसरा आला आहे. पण आता बाँम्ब त्यांच्याच खाली फुटतील. आमच्याकडे सर्व तयारी झाली आहे. आता आवाज येतील, असं देखील राऊत म्हणाले.

वर्षभरात जे साचलंय त्याचा आज पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे समाचार घेतील दसऱ्या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तयारी केली आहे. पण टार्गेट करणारं राजकारण शिवसेना कधीच करत नाही.  विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस कोरोनाबाधित झाले आहेत. फडणवीसांना वारंवार सांगत होतो काळजी घ्या. कोरोना कोणालाही सोडत नाही. लसीचं राजकारण करण्याइतक्या कोत्या मनोवृत्तीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाहीत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मागच्या दसऱ्या मेळाव्याला बोललो होतो की मुख्यमंत्री शिवसेनाचाच होणार.  भाजपसोबत युती झाली असती तरी शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला असता. वर्षभरात जे जे साचलं होतं ते ते आज पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे एक एकाचा समाचार घेतील, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

वर्षभरात जे साचलंय त्याचा पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे आज समाचार घेतील : संजय राऊत

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासंदर्भातील तयारीचा आढावा एबीपी माझाशी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासंदर्भातील तयारीचा आढावा सांगितला.  आजचं सीमोल्लंघन कसं असेल ते रात्रीच समजेल, असं संजय राऊत म्हणाले. 2019 चा दसरा मेळावा आमच्यासाठी महत्वाचा होता. मागच्या दसऱ्या मेळाव्याला बोललो होतो की मुख्यमंत्री शिवसेनाचाच होणार. त्यामुळे आजचा दसऱ्या मेळाव्याला अनन्यसाधारण महत्व आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेचा हा पहिलाच दसरा मेळावा असेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थाच्या बाजूला असलेल्या वीर सावरकर सभागृहात शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. या दसऱ्या मेळाव्याला मोजक्याच कार्यकर्त्यांची उपस्थिती असेल, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.

यंदाच्या दसऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्री भाजपाला टार्गेट करणार का? असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, कोरोना नसता तर शिवतीर्थ अपुरं पडलं असतं. दसऱ्या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तयारी केली आहे. पण टार्गेट करणारं राजकारण शिवसेना कधीच करत नाही. उद्धव ठाकरे काय बोलतील हे तुम्हाला संध्याकाळी समजेलच. लसीचं राजकारण करण्याइतक्या कोत्या मनोवृत्तीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाहीत. व्यासपिठावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलणार नाहीत, तर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

तर शिवतीर्थ अपुरं पडलं असतं संजय राऊत म्हणाले की, कोरोनाचं संकट नसते तर शिवतीर्थ अपुरं पडलं असतं. मुख्यमंत्र्यांचं संबोधन ऐकण्यासाठी शिवतीर्थावर तुफान आलं आसतं. तरीही वीर सावरकर सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता होणार असून समाजमाध्यमांच्या थेट प्रक्षेपणाद्वारे राज्यभरातील शिवसैनिकांना तो पाहता येणार आहे, असं ते म्हणाले.  ज्या पद्धतीनं मेळावा साजरा करतो त्याच पद्धतीनं साजरा करु. सर संघचालक आमचे आदर्श आहेत. त्यांनीही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत रेशीम बागेतील सभागृहात मेळावा घेतला. तसाच मेळावा शिवसेना घेत आहे, असंही राऊत म्हणाले.

जनाची मनाची आहे म्हणूनच... आम्ही नियम पाळतो म्हणून मोजक्या लोकांच्याच उपस्थितीत मेळावा घेतोय. पण बिहारमध्ये 50 हजार लोकांचे मेळावे चालले आहेत. त्याचं काय? आता तुम्हीच सांगा, जनाची, धनाची आणि मनाची लाज काढत आहेत. जनाची मनाची आहे म्हणूनच हा मेळावा शिवतिर्थावर न घेता यंदा सभागृहात घेतला आहे, असं ते म्हणाले.    बाळासाहेबांपासून आम्ही दसरा मेळावा पाहता आलो आहोत. तेव्हा आम्ही मागे उभे राहून साहेबांचं भाषण ऐकत असायचो.   शेवटच्या टोकाला उभं राहून भाषण ऐकण्यात मजा वेगळीच आहे. नंतर हळूहळू आम्ही पुढच्या रांगेत येत गेलो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
CM Oath Ceremony: आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
Ajit Pawar: शपथविधी सोहळ्यापूर्वी अजित पवारांची भाजपसमोर अट, आधी एकनाथ शिंदेंचं आटोपून घ्या, मग राष्ट्रवादीच्या मंत्रि‍पदांची चर्चा
शपथविधी सोहळ्यापूर्वी अजित पवारांची भाजपसमोर अट, आधी एकनाथ शिंदेंचं आटोपून घ्या, मग राष्ट्रवादीच्या मंत्रि‍पदांची चर्चा
Devendra Fadnavis : एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremonyमहायुती 2.O सरकारचा शपथविधी,सागर बंगल्याबाहेर 'महाराष्ट्र थांबणार नाही'चे बॅनरTop 9 Sec Superfast News  : Maharashtra : Mahayuti Oath Ceremony : महायुतीचा शपथविधी : ABP MajhaMahayuti Oath Ceremony : Superfast News : महायुतीचा शपथविधी : 05 Dec 2024 : ABP MajhaMahayuti Oath Ceremony : Devendra Fadnavis घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, शिंदेंचा निर्णय गूलदस्त्यातच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
CM Oath Ceremony: आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
Ajit Pawar: शपथविधी सोहळ्यापूर्वी अजित पवारांची भाजपसमोर अट, आधी एकनाथ शिंदेंचं आटोपून घ्या, मग राष्ट्रवादीच्या मंत्रि‍पदांची चर्चा
शपथविधी सोहळ्यापूर्वी अजित पवारांची भाजपसमोर अट, आधी एकनाथ शिंदेंचं आटोपून घ्या, मग राष्ट्रवादीच्या मंत्रि‍पदांची चर्चा
Devendra Fadnavis : एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
Devendra Fadnavis-Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला होकार कसा दिला, फडणवीसांनी समजूत कशी काढली, वाचा Inside Story!
एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला होकार कसा दिला, फडणवीसांनी समजूत कशी काढली, वाचा Inside Story!
Eknath Shinde & Devendra Fadnavis: वर्षा बंगल्यावरील अँटी चेंबरमध्ये फडणवीस-शिंदेंमध्ये नेमकी काय डिल झाली? गृहखात्याच्या मोबदल्यात शिवसेनेला कोणतं महत्त्वाचं खातं मिळणार?
देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंमध्ये नेमकी कोणती डिल झाली? शिवसेनेला गृहखात्याच्या मोबदल्यात कोणतं खातं मिळणार?
Pushpa 2 Premiere Stampede: 'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार, दोघांची प्रकृती गंभीर
'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
Embed widget