Sanjay Raut : काश्मिरी पंडितांवर हल्ले झाले त्या काळात मेहबूबा मुफ्तींशी भाजपची जवळीक : संजय राऊत
Sanjay Raut On BJP : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी जम्मू काश्मिरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांच्याशी केलेल्या युतीवरुन भाजपवर निशाणा साधला आहे.
![Sanjay Raut : काश्मिरी पंडितांवर हल्ले झाले त्या काळात मेहबूबा मुफ्तींशी भाजपची जवळीक : संजय राऊत Shiv Sena MP Sanjay Raut allegation On BJP kashmir issue and chandrakant patil statement Sanjay Raut : काश्मिरी पंडितांवर हल्ले झाले त्या काळात मेहबूबा मुफ्तींशी भाजपची जवळीक : संजय राऊत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/14/600a26d561ec67344e02d40abbb17df5_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sanjay Raut On BJP : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी आज पुन्हा भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी जम्मू काश्मिरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांच्याशी केलेल्या युतीवरुन भाजपवर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला काय वाटतं ते महत्त्वाचं आहे. कारण मेहबूबा मुफ्ती या भारतीय जनता पक्षाच्या मैत्रिण होत्या. मेहबूबा मुफ्ती यांचा राजकीय पक्ष आहे. तो पहिल्यापासून फुटीरतावाद्यांना मदत करणारा, पाकिस्तानला काश्मीरचा चर्चेत ओढणारा, अतिरेक्यांनी विषयी सहानुभूती दाखविणारा पक्ष होता. तरीही या पक्षासोबत भारतीय जनता पार्टीने युती करून सत्ता उपभोगली, असं ते म्हणाले.
राऊत म्हणाले की, त्याच काळात कश्मिरी पंडितांवर हल्ले झाले. त्याच काळात जे अतिरेकी लष्कराने मारले. त्या अतिरेक्यांना मेहबूबा मुफ्तींकडून स्वातंत्र्यसैनिक बनविण्याचा प्रयत्न झाला. तरी देखील भारतीय जनता पक्ष सरकारमधून बाहेर पडला नाही आणि आता कश्मीर फाईल्स बनवत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. मेहबूबा मुफ्ती आणि त्यांच्या पक्षाला ताकत देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केला आहे. त्यामुळे यासाठी जबाबदार भारतीय जनता पक्ष आहे, असं राऊत म्हणाले.
...मोदींची दोन तासांची झोप देखील उडाली
आम्ही महाराष्ट्रात पाहतो आहे की भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फार एक ऐतिहासिक वक्तव्य केलं आहे. या जगात दुसरं कोणी काम करत नाही. फक्त प्रधानमंत्री मोदी हे 22 तास काम करतात त्यांना फक्त दोन तास जेमतेम झोप मिळते. पण चंद्रकांत पाटील यांचं असं म्हणणं आहे की ते संशोधन करत आहेत की, जी दोन तास त्यांना झोप मिळते ती देखील मिळू नये आणि चोवीस तास त्यांनी काम करावं. हे ऐकून मोदींची दोन तासांची झोप देखील उडाली आहे. चमचेगिरी तर सगळीकडेच होते पण असे चमचे आम्ही पाहिले नाहीत, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
MLA Houses In Mumbai : व्यवसायानं बिल्डर, ऐपतीनं कोट्यधीश तरी घरांची खिरापत कशाला?
मुंबई ही अनेकांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, पण महाविकास आघाडी कष्टकऱ्यांना घरे बांधून देणार: उद्धव ठाकरे
माकडछाप दंतमंजन, ते तुम चाहो तो स्कूटर को कार कह दो, 2 कवितेतून फडणवीसांचा हल्ला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)