एक्स्प्लोर
Advertisement
मी माझ्या वक्तव्यावर ठाम; भाजपने महिला आयोगाला हाताशी धरून अटक करायचा खेळ रचलाय : प्रताप सरनाईक
भाजपने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी मी तयार, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं ट्विट
मुंबई : राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि अभिनेत्री कंगना रनौतमधील आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक काल कंगना रनौत जर मुंबईमध्ये आली तर शिवसेनेच्या रणरागिणी कंगणाचं थोबाड फोडतील असं वक्तव्य केलं होतं. यावरुन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सरनाईकांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
यावरुन शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ‘मी माझ्या वक्तव्यावर ठाम’ असल्याचं ट्विट केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नक्की काय म्हटलं आहे ते पाहू. “मी माझ्या विधानावर ठाम आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 106 वीरांनी पत्करलेल्या हौतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मराठी माणसाच्या रक्त सांडून मिळवलेल्या मुंबई बद्दल कोणीही काहीही बोलेल तर खपवून घेणार नाही.
भाजपने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी मी तयार आहे.”
राष्ट्रीय महिला आयोगाची भूमिका काय?
कंगनाच्या कोणत्याही ट्विटमध्ये असं कुठेचं वाटलं नाही, की ती देशद्रोही आहे किवा तीने कोणत्याही व्यक्तीला धमकावलं आहे असं मतं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी व्यक्त केलं आहे. तसेच या प्रकरणावरुन शिवसेनेच्या नेत्यांची 'महिलांनी तोंड बंद ठेवाव' ही विचारधारा समोर येते. राष्ट्रीय महिला आयोगाने ही भूमिका कंगना अभिनेत्री आहे म्हणून घेतलेली नाही. उद्या जर कोणालाही अशी धमकी आली तर राष्ट्रीय महिला आयोगाची हीच भूमिका घेईल, असं रेखा शर्मा म्हणाल्या.
#KanganaRanaut बाप रे बाप..कंगनाचा डोक्याला ताप, कंगनाच्या टिवटिवमुळे दिवसभर राजकारण तापलं, राज्यभरातून संतापाची लाट
काय आहे प्रकरण?
कंगना गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांवर सातत्याने टिका करते आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा तपास योग्य होत नसल्यावरून तिने मुंबई पोलिसांवर टीका केली. त्याची आत्महत्या नसून हत्याच आहे असं सांगतानाच मुंबई पोलिसांवर तिने अनेक गंभीर आरोप केले. मुंबई पोलिसांची आपल्याला सातत्याने भीती वाटत असल्याचं तिने सांगितलं. यावरूनच खासदार संजय राऊत यांनी ज्या लोकांना मुंबईची इतकी भीती वाटते त्यांनी मुंबईत येऊ नये असं वक्तव्य केलं.
याच वक्तव्याचा विपरित अर्थ घेत त्याला धमकी ठरवून कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिली. जी मुंबईसह महाराष्ट्राच्या जिव्हारी लागली. त्यावर अनेक मराठी, हिंदी, कलाकार ट्विटरवर व्यक्त झाले. यात सोनू सूद, रेणुका शहाणे, सई ताम्हणकर, सुबोध भावे, सायली संजीव, शेखर फडके, मंगेश देसाई, समीर विद्वांस आदी अनेक कलाकारांचा समावेश होतो. अनेकांनी मुंबई आपल्याला प्रिय असल्याचं यात म्हटलं आहे. नेटकऱ्यांनी मात्र कंगनाच्या या वक्तव्याचा यथेच्छ समाचार घेतला. तर बीजेपीच्या समर्थकांनी कंगनाला पाठिंबा दिला.
भाजप समर्थक आणि मुंबईप्रेमी आमनेसमाने भिडल्याचं चित्र यात दिसत होतं. असं असतानाच आज कंगनाने आणखी एक ठिणगी पेटवून दिली. मी मुंबईला न येण्याबद्दल धमकावलं जात आहे. आता तर मी मुंबईत येणारच. येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मा मुंबईला येणार आहे. वेळ मी कळवेनच. कुणाच्या बापात हिंमत असेल तर त्यांनी मला रोखून दाखवावं असं आव्हान तिनं दिलं आहे. यानंतर या वादाला सुरुवात झाली.
संबंधित बातम्या
- पोकळ धमक्या देत नाही, मी ॲक्शन करणारा माणूस : संजय राऊत
- मी येणार, कुणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर मला अडवा : कंगना रणौत
- मुंबई पोलिसांबद्दल 'जजमेंटल' होऊन 'पंगा' घेऊ नये, मनसेचा कंगनाला इशारा
- 'उचलली जीभ, लावली टाळ्याला', रेणुका शहाणेंचा कंगनावर संताप, तर कंगना म्हणते...
- कंगना रानौतकडून मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरबरोबर; सोशल मीडियावर संताप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
भारत
Advertisement