एक्स्प्लोर
Advertisement
'दसरा मेळाव्याला 5 लाख कार्यकर्ते शिवाजी पार्कवर बोलवा'
पाच लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर बोलवा, असे आदेश शिवसेना नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिले.
मुंबई: अगामी निवडणुकीत शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा असेल, तर दसरा मेळाव्यात ताकद दिसली पाहिजे. त्यामुळे पाच लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर बोलवा, असे आदेश शिवसेना नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिले.
शिवसेनेने गणेशोत्सवानंतर आता दसरा मेळाव्याची तयारी सुरु केली आहे. दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी शिवसेनेने आज शिवसेना भवनात बैठक बोलावली होती. शिवसेना खासदार संजय राऊत, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर आणि रघुनाथ कुचिक यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
या बैठकीसाठी ठाणे, पुणे, कल्याण, नाशिक पालघर, रायगड, माव़ळ, उरण, भिवंडी मतदारसंघातून कार्यकर्ते आले होते. शिवतीर्थावर शिवसेना शक्तीप्रदर्शन करणार आहे. निवडणुकीआधी दसरा मेळावा जोरदार करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
पाच लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते शिवाजी पार्कवर बोलवा, असे आदेश यावेळी कार्यकर्त्यांना देण्यात आले.
देशाचा पंतप्रधान निवडायची जर वेळ आली तर शिवसेनेची भूमिका महत्वाची असेल. भाजपला प्रत्येक शिवसैनिकाने ताकद दाखवण्यासाठी दसरा मेळावा हे योग्य व्यासपीठ आहे. भाजपला शिवसेनेची ताकद शिवतीर्थावर दिसली पाहिजे, असंही या बैठकीत ठरलं.
दसरा मेळाव्याच्या बैठकीत काय झालं?
शिवतीर्थावर शिवसेना शक्तीप्रदर्शन करणार
ठाणे, पुणे, कल्याण, नाशिक पालघर, रायगड, माव़ळ, उरण, भिवंडी मतदारसंघातून कार्यकर्ते आले होते.
निवडणुकीआधी दसरा मेळावा जोरदार करण्यावर भर
पाच लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते शिवाजी पार्कवर बोलवा, नेत्यांचे कार्यकर्त्यांना आदेश
शिवतीर्थावर शिवसेनेची ताकद दाखवून द्या
अगामी निवडणुकीत शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा असेल, तर दसरा मेळाव्यात ताकद दिसली पाहिजे.
जर देशाचा पंतप्रधान निवडायची वेळ आली तर शिवसेनेची भूमिका महत्वाची असेल
भाजपला प्रत्येक शिवसैनिकाने ताकद दाखण्यासाठी दसरा मेळावा हे योग्य व्यासपीठ आहे
भाजपला शिवसेनेची ताकद शिवतीर्थावर दिसली पाहिजे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement