एक्स्प्लोर

शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? : नारायण राणे

पालघर साधू हत्याकांड प्रकरणी जनआक्रोश यात्रेला सुरुवात होण्याआधीच पोलिसांनी राम कदम यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर काही वेळाने त्यांची सुटका केली. यानंतर भाजपचे नेते नारायण राणे यांनी कदम यांची भेट घेतली. यावेळी राणेंनी महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मुंबई : "शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची?" असा घणाघात भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला आहे. "ठाकरे सरकारची साधूसंताना न्याय देण्याची इच्छा नाही आहे," असेही नारायण राणे म्हणाले. पालघर साधू हत्याकांड प्रकरणी भाजपचे आमदार राम कदम यांनी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं. परंतु यात्रा सुरु होण्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी राम कदम यांना ताब्यात घेतलं. त्यांची सुटका घेतल्यानंतर भाजपचे नेते नारायण राणे यांनी राम कदम यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे. हे तिन्ही पक्ष हिंदूविरोधी आहेत असे म्हणणार नाही. पण शिवसेना हिंदुत्ववादी राहिली नाही. शिवसेनेला मी हिंदुत्ववादी म्हणणार नाही. हे तर तडजोडवादी आहेत. गद्दारी करुन शिवसेना सत्तेत आली. उद्धव ठाकरे हे हिंदुत्व विचारसरणीचे नाहीत. पदासाठी हवे ते करणारे उद्धव ठाकरे आहेत. शिवसेना म्हणजे हिंदुत्व विचार आणि समीकरण नाही अशी टीका ही नारायण राणे यांनी केली आहे.

'जनआक्रोश' यात्रेपूर्वी ताब्यात घेतलेल्या भाजप नेते राम कदम यांची पोलिसांकडून सुटका

राम कदमांच्या जनआक्रोश यात्रेचा उद्देश काय? भाजप नेते राम कदम यांनी पालघर हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा या मागणीसाठी आपल्या निवासस्थानापासून ते पालघरमधील हत्याकांड झालेल्या ठिकाणापर्यंत जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं. मात्र या यात्रेला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. मुंबई पोलिसांनी सकाळपासूनच राम कदम यांच्या खारमधील निवासस्थानाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. राम कदम निवासस्थानाबाहेर येताच पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यानंतरही घोषणाबाजी सुरुच राहिली. अशातच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी राम कदम यांना ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर काही वेळाने राम कदम यांची सुटकाही करण्यात आली.

साधूसंतांसाठी, हिंदुत्वासाठी भाजप लढत राहणार : प्रवीण दरेकर पालघरला जी साधू संतांची हत्या झाली त्या संदर्भात आवाज उठवणे, न्याय मागणे सुद्धा ठाकरे सरकारच्या काळात गुन्हा झाला आहे. लोकप्रतिनिधी राम कदम यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतलं. राज्यामध्ये जुलमी राजवट सुरु आहे. याचा प्रत्यय आज पुन्हा दिसून आला. परंतु तुम्ही कितीही मुस्कटदाबी करा, कितीही लोकांना अटक करा, या राज्यामध्ये साधुसंतांसाठी, हिंदुत्वासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी भाजपा आणि महाराष्ट्र प्रेमी कार्यकर्ते हिंदुत्व प्रेमी कार्यकर्ते लढत राहतील. आपल्याला जाब विचारत राहतील, असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.

काय आहे प्रकरण? कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी असताना कांदिवली (मुंबई) येथून गुजरात राज्यात आडमार्गाने प्रवेश घेऊ पाहणार्‍या चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी (70 वर्ष), सुशिलगिरी महाराज (35 वर्ष), निलेश तेलगडे (30 वर्ष) या तिघांची महाराष्ट्र व दादरा नगरहवेली केंद्रशासित प्रदेशाच्या हद्दीजवळ डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे गावकऱ्यांनी अमानुषपणे मारहाण करून निर्घृणपणे हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी 110 हल्लेखोरांना ताब्यात घेतलं होतं. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावाला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आलं होतं. पालघर पोलीस अधीक्षक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि दोनशे पोलिस कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला होता. या प्रकारात अजूनपर्यंत 110 ग्रामस्थांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न आणि इतर कलमे लावण्यात आली आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
Embed widget