एक्स्प्लोर

Aditya Thackeray : मुंबईत साडेआठ हजार कोटींची कामं खोक्यांसाठी थांबलेत, एनओसी न देण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांवर दबाव; आदित्य ठाकरेंचा आरोप

Aditya Thackeray On BMC: आमचं सरकार सत्तेत आल्यानंत ज्यांनी मुंबईला लुटलं त्यांना जेलमध्ये टाकणार असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. 

मुंबई: शहरात सर्व मिळून साडेआठ हजार कोटींची कामे पडून आहे आणि ही रस्त्यांची काम होऊ नयेत यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी (Mumbai Police) एनओसी देऊ नये यासाठी त्यांच्यावर खोके सरकारकडून दबाव आहे असा आरोप आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे. आमचं सरकार आल्यानंतर या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचंही ते म्हणाले. 

आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांच्या रखडलेल्या कामांवरून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ज्या शहरांमध्ये प्रशासक आहेत त्या शहरांमध्ये घोटाळे सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, गेले 10 ते 12 महिने आम्ही रस्त्यांचा विषय मांडतोय. मुंबईत पाच पॅकेट कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांपैकी एका कॉन्ट्रॅक्टरला टर्मीनेशन नोटीस गेली. या नोटिशीला कंत्राटदारानं उत्तर दिलं. त्याची सुनावणी महापालिकेत या आठवड्यात होणार आहे. या सुनावणीनंतर  कंत्राटदारावर कारवाई होते की खोके घेऊन कारवाई थांबवली जाते हे आम्हाला बघायचं आहे. 

एनओसी न देण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांवर दबाव

एका वर्षात खड्डेमुक्त मुंबई करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. मुंबईत रस्त्याची कामे 1 ऑक्टोबर ते 31 मे पर्यंत पूर्ण होतील असं राज्य सरकारने सांगितलं आहे. पण मुंबईत एकाही रस्ते कामाला सुरुवात नाही. अडीच हजार कोटींची कामे तशीच्या तशी पडून आहेत. ट्रॅफिक पोलिसांच्या एनओसी न मिळाल्याचे दाखवून रस्त्याची कामे रखडवली जातायेत. मोठा गाजावाजा करुन सहा हजार कोटीच्या कामांची घोषणा केली, नारळ फोडला. पण ती कामेही पडूनच आहे.

मुंबईत धुळीमुळे मोठं प्रदूषण होतंय. त्याच त्या गाईडलाईन काढल्या जात आहेत. कन्स्ट्रक्शन साईटवरुन येणाऱ्या धुळीवर कोणतंही नियंत्रण नाही. 24 पैकी 15 वॉर्डमध्ये वॉर्ड ऑफिसर नाही. परीक्षा होऊन निकालही लागला पण नियुक्त्या खोक्यांसाठी थांबल्या असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. 

आमचं सरकार लवकरच येईल, आमचं सरकार ज्यांनी मुंबईला लुटलं त्यांना जेलमध्ये टाकणारच असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Embed widget