(Source: ECI/ABP News/ABP Majha)
34 याचिका 6 गटात विभागल्या, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कुणाच्या फायद्याचा ठरणार?
आमदार आपात्रतेसंदर्भातील आजची सुनावणी संपली असून पुढील सुनावणी ही 26 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
मुंबई : आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर आजची प्रत्यक्ष सुनावणी पार पडली. आता पुढची सुनावणी 26 ऑक्टोबरला होणार आहे. आजच्या सुनावणीत वर्गवारी करण्यात आले. 34 वेगवेगळ्या याचिका आता यापुढे 6 याचिकेत मांडल्या जातील. ठाकरेंच्या वकिलांनी आज पुन्हा एक नवा अर्ज केला आहे. काही डॉक्युमेंट हे शिंदे गटाकडून मागितले. 25 ऑक्टोंबरपर्यंत सगळ्यांनी आपले मत मांडायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या म्हणजे 26 ऑक्टोबरला पुढची सुनावणी होईल.
ठाकरे गट प्रत्येक सुनावणीत नवा अर्ज देत आहे त्यामुळे ही सुनावणी लांबत आहे, असं अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. अर्जावर अर्ज येत आहेत. जर अर्ज येत राहिले तर सुनावणी लांब जाईल. सुप्रीम कोर्टातील याचिका वेगळी आहे. इथली याचिका वेगळी आहे. हे ट्रिब्यूनल अर्थात लवात आहे. इथे प्रक्रिया आहे. इथे ट्रायल होते, असं राहुल नार्वेकर म्हणाले.
राहुल नार्वेकरांची नाराजी
राहुल नार्वेकर यांनी आज नाराजी वक्त केली. दरवेळेस वेगवेगळ्या याचिका अर्ज दाखल केले जातात. त्यात वेळ घालवला जातो. येथे एक भूमिका आणि सर्वोच्य न्यायालयात वेगळी भूमिका का घेता, असा सवाल राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाला केला.जर मी सुनावणी घेत आहे
तर सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे माझ्यासमोर सादर करा, अशा सूचना राहुल नार्वेकरांनी दिल्या.
आजच्या सुनावणीत काय झालं?
विधानसभा राहुल नार्वेकरांसमोर पार पडलेल्या सुनावणीमध्ये आज एकत्रित असे सहा गट तयार करण्यात आले आहेत. यामध्ये एकूण 34 याचिका आहेत. याच 34 याचिकांचे सहा गट तयार करण्यात आले आहेत. यामध्ये 1 ते 16 ठाकरे गटाच्या याचिका असतील. एकंदरीत ढोबळ वर्गवारी केली असल्याची माहिती वकिलांनी दिली.
बच्चू कडू यांची बाजू मांडणारे ॲड. प्रवीण टेंबेकर काय म्हणाले?
आजच्या सुनावणीत एकत्रित सुनावणीच्या बाबतीत 6 गट केले आहेत. आजच्या दिवशी एवढ्याच मुद्द्यावर चर्चा झाली. 34 वेगवेगळ्या याचिका आता यापुढे 6 याचिकेत मांडल्या जातील, त्यामध्ये
पहिल्या मिटींग हजर राहिले नाही
दुसऱ्या मिटींगला उपस्थितीत नव्हते
स्पीकर विरोधात मतदान करणे
बहुमत चाचणी मतदान व्हीप विरोधात
भरत गोगावले व्हीप बजावले मोडला याचिका
अपक्ष आमदार गट याचिका
असे सहा गट करण्यात आले आहेत. एकंदरीत ढोबळ वर्गवारी केली आहे, असं वकिलांनी सांगितलं.
ठाकरे गटाचे वकील सनी जैन काय म्हणाले?
आज तारीख होती ती याचिका एकत्रित करण्यासाठी होती. 6 याचिकामध्ये क्लब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 ते 16 ठाकरे गट याचिका गृप A, याचिका नंबर 17 ठाकरे गटाकडून अपक्ष आमदार विरोधात दाखल केल्या आहेत. आम्ही कुठल्याही प्रकारे वेळ वाढवून घेत नाही. फक्त अर्ज दाखल केलाय. आम्हाला कागदपत्र रेकॉर्डवर आणयाचे आहेत. ज्यामध्ये 2 जुलैला व्हीप आमच्या गटाकडून समोरच्या आमदारांना देण्यात आला होता. वेळापत्रक संदर्भात आम्ही आक्षेप घेतला आहे आणि त्यावर निर्देश सर्वोच्च न्यायालय देईल, असं ठाकरे गटाचे वकील सनी जैन म्हणाले.