एक्स्प्लोर
Advertisement
पार्थच्या उमेदवारीवर पवार अनुकूल नाहीत, अजित पवारांचं सूचक मौन
अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात सुरु आहे.
मुंबई: लोकसभा निवडणूक 2019 च्या तयारीसाठी सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आज पार्थ पवार हे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात सुरु आहे. मावळ मतदारसंघातून पार्थ लोकसभा लढवणार असल्याची चर्चा आहे. या चर्चांवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांची पहिलीच प्रतिक्रिया आली आहे. मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी शरद पवार अनुकूल नाहीत. पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढवली, तर पक्षबांधणी करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याना संधी कधी मिळणार? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला.
शरद पवारांच्या प्रश्नावर अजित पवारांनी मात्र या बैठकीत सूचक मौन बाळगणं पसंत केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत दोन दिवस बैठक होत आहे. दोन दिवसांच्या या बैठकीत काँग्रेसकडील मतदारसंघांवर दावा सांगताना राष्ट्रवादी हा मतदारसंघ कशा प्रकारे जिंकणार याचा आढावा घेतला जाणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार राज्यातील 48 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे 25 जागांची मागणी केली आहे. त्यातली एक जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादी आपल्या कोट्यातून देण्यास तयार आहे. राष्टावादी काँग्रेसला काँग्रेसकडून काही जागा बदलून हव्या आहेत.
2019 ची निवडणूक महत्वाची असल्याने या निवडणुकीत काहीही करून दोन आकडी जागा जिंकण्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे.
तटकरे की भास्कर जाधव?
दुसरीकडे रायगडमधून माजी मंत्री आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर जिल्हा पातळीवरुन माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं नाव आलं आहे. त्यामुळे तटकरे की भास्कर जाधव याबाबत चर्चा सुरु आहे.
मावळसाठी लक्ष्मण जगताप उत्सुक
ज्या मतदारसंघात पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा आहे, त्या मावळ मतदारसंघातून लक्ष्मण जगताप यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक केली आहे.
संबंधित बातम्या
निवडणूक लढवणार की नाही? शरद पवारांचं उत्तर
तटकरे की भास्कर जाधव, राष्ट्रवादीची खलबतं, पार्थबाबत पवार म्हणतात...
मुंबई | पार्थ पवार लोकसभा लढणार? वडील अजित पवारांची विशेष मुलाखत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
मुंबई
निवडणूक
हिंगोली
Advertisement