एक्स्प्लोर
अर्थ बजेटचा : अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात उसळी
पियुष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शेअर बाजारातही मोठी उसळी पाहायला मिळाली. निफ्टीने 11 हजार अंकांच्या दिशेने झेप घेतली, तर सेन्सेक्सही जवळपास 452 अंकांनी उसळला.

फाईल फोटो
मुंबई : मोदी सरकारच्या अंतरिम बजेटमधून शेतकरी आणि मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना करातून सवलत देण्यात आली आहे. या घोषणेनंतर शेअर बाजारातही मोठी उसळी पाहायला मिळाली. निफ्टीने 11 हजार अंकांच्या दिशेने झेप घेतली, तर सेन्सेक्सही जवळपास 452 अंकांनी उसळला. निफ्टीने 144 अंकांची उसळण घेऊन 10 हजार 907 अंकांवर झेप घेतली. सेन्सेक्सही 452 अंकांनी उसळून 36 हजार 750 अंकांवर पोहचला. अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी शेअर मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स शुक्रवारी सकाळी 106.88 अंकांनी वधारुन 36,363.57 वर आणि निफ्टीदेखील जवळपास याच वेळी 33.50 अंकांच्या तेजीसह वधारल्याचे दिसून आलं होतं. हिरो मोटोकॉर्प, एचसीएल, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, इन्फोसिस, एचडीएफसी, हिंदुस्थान युनिलीव्हर, महिंद्रा अॅन्ड महिंद्रा, लार्सन-टुब्रो, आईटीसी आणि मारुती या ऑटोमोबाईल कंपन्यांना प्रामुख्याने याचा लाभ झाला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण






















