एक्स्प्लोर
Advertisement
सत्यजीत तांबे यांची राज्य युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी बाजी मारली आहे.
मुंबई: महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी बाजी मारली आहे. सर्वाधिक मते घेत सत्यजीत तांबे यांनी युवक काँग्रेस अध्यक्षपद पटकावलं. वाशिम जिल्ह्यातील रिसोडचे आमदार अमित झनक यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. त्यामुळे अमित झनक यांच्याकडे उपाध्यक्षपद असेल. शिवाय कुणार राऊत हे सुद्धा उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.
सत्यजीत तांबे यांच्या विजयानंतर संगमनेरमध्ये तांबेच्या निवासस्थानी एकच जल्लोष झाला. कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला.
आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे हात बळकट करणार असल्याची प्रतिक्रिया तांबे यांनी दिली. युवकांना बरोबर घेऊन राहुल गांधीना पंतप्रधान करण्यासाठी आपली निवड असल्याचं सत्यजीत तांबे म्हणाले.
कोण आहेत सत्यजीत तांबे ?
◆ सत्यजीत तांबे हे काँग्रेस नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत.
◆नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दोन वेळा अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे.
◆ अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती.
◆ गेल्या पंधरा वर्षांपासून एनएसयूआय आणि युवक काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठी संघटनबांधणी त्यांनी केली आहे.
◆ अभ्यासू, आक्रमक आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेला काँग्रेसमधील युवानेता अशी त्यांची ओळख आहे.
◆ या आगोदर दोन वेळा त्यांनी युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपद भूषविले आहे, आ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली ते युवक काँग्रेसमध्ये कार्यरत होते.
संबंधित बातम्या
नवी दिल्ली : काँग्रेसच्या महाअधिवेशनाचा आज दुसरा दिवस, सत्यजीत तांबे यांच्याशी बातचीत
राष्ट्रपती निवडणुकीत नगरमधील 2 आमदार फुटले : सत्यजीत तांबे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement