Sanjay Raut : मोदींच्या हुकूमशाहीविरोधात लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आमच्यासोबत : संजय राऊत
Sanjay Raut, Mumbai : महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते आज एकत्र जमले होतो. कोणी कोठून लढायचे यावर आमचे एकमत आहे. वंचित बहुजन आघाडीचे काही प्रतिनिधी आज हजर होते.
Sanjay Raut, Mumbai : महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते आज एकत्र जमले होतो. कोणी कोठून लढायचे यावर आमचे एकमत आहे. वंचित बहुजन आघाडीचे काही प्रतिनिधी आज हजर होते. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमचा संवाद सुरु आहे. देशात हुकूमशाही आणि संविधानाच्या विरोधात मोदींनी मोर्चा सुरु केलाय. त्याच्याविरोधात लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आमच्यासोबत आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत. मुंबईत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे चालना मिळाली
संजय राऊत म्हणाले, उद्या पुन्हा आम्ही बैठक घेणार आहोत. त्यानंतर कोणतीही बैठक होणार नाही. आम्ही एकत्र बसल्यानंतर आमच्या लक्षात आले की, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. प्रत्येक जागा जिंकायचे हे सूत्र ठरलेलं आहे. आज पृथ्वीराज चव्हाण होते, त्यामुळे आम्हाला चालना मिळाली.
वंचितचे प्रतिनिधीही आज समाधानाने बसले
पृथ्वीराज चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीला विनंती केली की, तुम्हाला मिळणाऱ्या जागीही आपल्याला जिंकायच्या आहेत. त्यामुळे वंचितचे प्रतिनिधीही आज समाधानाने बसले होते. त्यांना आज आम्ही मोठा आकडा दिला आहे. त्यांची उद्या पुण्यात सभा आहे. त्यानंतर त्यांच्या कार्यकारणीची बैठक देखील होणार आहे. त्यानंतर ते आमच्या बैठकीला देखील उपस्थित राहणार आहेत.
भाजप हा संपलेला पक्ष आहे.
भाजपाने स्वत:च्या हिंमतीवर निवडणूक लढवावी. भाजप हा संपलेला पक्ष आहे. तो आयसीयूमधला पक्ष आहे. महानगरपालिकेच्या निवडणूका घेऊन दाखवा. तुमची मुंबई महानगरपालिकेसह 16 महानगरपालिकेच्या निवडणूका घेण्याची हिंमत नाही. तुम्हाला नांदेडची जागा ताब्यात ठेवण्यासाठी अशोक चव्हानांना सोबत घेऊन राज्यसभा द्यावी लागते, हा तुमचा पक्ष आहे. तुम्ही आम्हाला काय सांगत आहात, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
आम्ही ठरवलं तर एका दिवसात भाजप संपेल, भाजपची भूमिका हुकूमशाहीची, आम्ही ठरवलं तर एका दिवसात भाजप नष्ट होईल, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपची ताकद परावलंबी असून छोट्या पक्षांना संपवण्यावर त्यांचं लक्ष आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केलंय.
इतर महत्वाच्या बातम्या