एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Sanjay Raut : बाप बदलण्याची भाषा कोण करतंय? डोंगर, झाडीत विवेक हरवू नका; गुलाबराव पाटलांचा व्हिडीओ ट्वीट करत संजय राऊतांचा हल्लाबोल

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल सभेत बंडखोर आमदारांवर जोरदार प्रहार केल्यानंतर आज पुन्हा एक व्हिडीओ ट्वीट करत हल्लाबोल केला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ आहे.

Sanjay Raut Tweet : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल सभेत बंडखोर आमदारांवर जोरदार प्रहार केल्यानंतर आज पुन्हा एक व्हिडीओ ट्वीट करत हल्लाबोल केला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ आहे. संजय राऊतांनी ट्वीट करत म्हटलंय की, बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा. श्रीमान केसरकर, थोडा संयम ठेवा. डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका. आपण यांना ओळखता ना? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. 

व्हिडीओत काय म्हटलंय
गुलाबराव पाटील यांनी केलेल्या एका भाषणाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत गुलाबराव पाटील म्हणत आहेत की, शिवसेनेत पुंगी वाजवणारे विजयराज शिंदे आमदार झाले. शिवसेनेत रिक्षा चालवणारे दिलीप भोळे आमदार झाले. पानटपरी चालवणारे गुलाबराव पाटील तुमच्यासमोर मंत्री म्हणून बोलतोय. हे सोडा सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले. 'कतलिया कही साप बदल लेते है, पुण्य की आड में पाप बदल लेते है, मतलब के लिए कई लोग अपने बाप बदल लेते है', असं गुलाबराव पाटील या व्हिडीओत म्हणत आहेत. 

सामनाच्या अग्रलेखात भाजपवर जोरदार टीका

सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेनं भाजपवर जोरदार टीका केली आहे.  'नाच्यांची 'वाय झेड'' या मथळ्याखाली आजचा सामनाचा अग्रलेख लिहिण्यात आला आहे.  राजकीय विरोधकांविरोधात खोटे आरोप करणाऱ्या , धमक्या देणाऱ्या भाजपपुरस्कृत मंडळींना 'वाय'पासून 'झेड'पर्यंत सुरक्षा देण्याचा सपाटाच केंद्रातील भाजप सरकारने लावला आहे, असा थेट आरोप सामनाच्या माध्यमातून शिवसेनेनं केला आहे. 

अग्रलेखात म्हटलं आहे की, देशभरात अशा 'वाय'वाल्यांची फौजच त्यांना उभी करायची आहे काय? त्यांच्या याच फौजेत आता गुवाहाटीमध्ये असलेल्या 15 गद्दार 'नाच्यां'ची भर पडली आहे. त्यांनाही केंद्राने 'वाय प्लस' सुरक्षा देण्याचे जाहीर केले आहे. मोदी सरकारचा हा निर्णय केंद्रीय सुरक्षेची 'वाय झेड' करणारा तर आहेच, शिवाय गुवाहाटीत सुरू असलेल्या महाराष्ट्रद्रोहाच्या तमाशाचा फड भाजपच्याच तालमीत सुरू असल्याचा पुरावा देखील आहे. भाजपच्या महाराष्ट्रद्रोहाचे पितळ त्यामुळे पूर्णपणे उघडे पडले आहे, असं लेखात म्हटलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Maharashtra Political Crisis Timeline : राजकीय सत्तासंघर्षाचा आज सातवा दिवस, पहिल्या दिवसापासून आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?

'महाराष्ट्रद्रोहाच्या तमाशाचा फड भाजपच्याच तालमीत'; बंडखोरांना 'नाच्यांची' उपमा देत सामनातून हल्लाबोल 

बंडखोर आमदारांच्या गावात 'माझा' : गुलाबराव पाटील यांच्या गावातील शिवसैनिक कुणाच्या बाजूनं?

'महाराष्ट्रद्रोहाच्या तमाशाचा फड भाजपच्याच तालमीत'; बंडखोरांना 'नाच्यांची' उपमा देत सामनातून हल्लाबोल 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar vs Ajit Pawar : बारामतीच्या उमेदवारीवरून शरद पवार-अजित पवार आमनेसामनेABP Majha Headlines :  12 PM :  25  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRam Shinde Full PC : माझा पराभव हा नियोजित कट, त्यात अजित पवार सहभागी; राम शिंदेंचा आरोपCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Gokul Milk : निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Ajit Pawar Rohit Pawar meet : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
Embed widget