एक्स्प्लोर

घटनेच्या पदावर बसलेल्या माणसाने काल राजकीय पत्रकार परिषद घेतली, संजय राऊतांची नार्वेकरांवर टीका

दुसऱ्याचे पाकीट मारायचं आणि आपल्या खिशात ठेवायचे तशी शिवसेना फार काळ टिकणार नाही. शिंदे गटाच्या जागा मुंबईतले भांडवलदार आणि गुजरातचे उद्योगपती ठरवणार आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. 

मुंबई :  विधानसभा अध्यक्ष (Vidhan Sabha)  राहुल नार्वेकर (Rahul Narwekar)  यांनी सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court)  निर्णय कसे पायदळी तुडवले याचे प्रत्यक्ष पुरावे काल सादर केले. त्यामुळं घटनेच्या पदावर बसलेल्या माणसाने राजकीय पत्रकार परिषद घेतली, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे  खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी केली आहे. तसेच लग्न एकदाच होते,लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाच्या वेळी सर्टिफिकेट घेऊन फिरावं लागत नाही, असा टोला देखील त्यांनी नार्वेकरांना लगावला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेशपायदळी तुडवले, मनमानी केली. याचे  प्रत्यक्ष पुरावे हे काल समोर आणले. राहुल नार्वेकरांनी नंतर राजकीय पत्रकार परिषद घेतली.  ही हास्यास्पद होती. त्यांना मला सांगायचं आहे आपण वकील आहात आणि देवेंद्र फडणवीस देखील वकील आहेत. दोन वकिलांनी एकत्र बसावं आणि एकदा काय ते ठरवावे.

संजय राऊतांचा नार्वेकरांना खोचक टोला

लग्न एकदा होतं प्रत्येक लग्नाच्या वाढदिवसाला जी असते त्याला सर्टिफिकेट दाखवावे लागत नाही. तसेच घटना एकदा दिलेली असते. मग त्याच्यामध्ये जे बदल होत असतात ते आपण वेळोवेळी कळवत असतो. शिवसेनेने वेळोवेळी झालेले बदल घटनेमध्ये आणि ठराव कसे कळवले  आहे.  त्या संदर्भातील पोचपावत्य निवडणूक आयोगात पोहचल्याचे पुराव्यासह काल दाखवल्या आहेत, असेही संजय राऊत म्हणाले. राहुल नार्वेकर रोज पक्षांतर करण्याच्या भुमीकेत आहे. ते विधानसभा अध्यक्ष आहे.  या भुमीकेत अजून गेलेच नाही . दसरा मेळावा हा सुद्धा जनता न्यायालयात असतो आपण सुद्धा त्या मेळाव्याला अनेकदा हजर राहिले आहेत, असे देखील संजय राऊत म्हणाले.

साडेअकरा कोटी महाराष्ट्रातील जनतेच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला : संजय राऊत

माझे भाजपले खुले आव्हान आहे. जनतेसमोर या,  निवडणुका होऊ द्या तुमची सत्ता जाईल.  तुम्हाला जनता रस्त्यावर फिरणं मुश्किल करेल, साडेअकरा कोटी महाराष्ट्रातील जनतेच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला आहे. महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान तुम्ही जर पायदळी तुडवला  आहे. तुम्ही कसले मराठी माणूस? तुम्ही बकवास आहात? अशी टीका देखील संजय राऊतांनी केली आहे. 

शिंदे गटाच्या जागा मुंबईतले भांडवलदार आणि गुजरातचे उद्योगपती ठरवणार : संजय राऊत

जागवाटपावर बोलताना संजय राऊत म्हणाले, खरी शिवसेना उद्धव ठाकरेंकडे आहे. आम्ही 23 जागा लढत आहे . आधी सुद्धा लढत आहे आणि त्याच्यानंतर ही लढू ही खरी शिवसेना आहे. आताची मिंध्याची शिवसेना ही पाकीट मारी आहे. दुसऱ्याचे पाकीट मारायचं आणि आपल्या खिशात ठेवायचे तशी शिवसेना फार काळ टिकणार नाही. शिंदे गटाच्या जागा मुंबईतले भांडवलदार आणि गुजरातचे उद्योगपती ठरवणार आहेत, असे देखील संजय राऊत म्हणाले. 

हे ही वाचा:

Uddhav Thackeray : राहुल नार्वेकरांनी अन्यायाचं नाव न्याय ठेवलं; महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंकडून चिरफाड, राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Arjun Khotkar Jalna : शहरात पदयात्रा काढत खोतकरांच्या परिवाराचा प्रचारSharad Pawar : शिवसेना भाजपपासून वेगळी करण्यासाठी 2014 च्या पाठिंब्याचं वक्तव्यTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 8 AM : 13 नोव्हेंबर  2024: ABP MajhaPM Narendra Modi : महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांसोबत पंतप्रधान मोदींचा संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
×
Embed widget