Shiv Sena Press Conference Highlights : मला जेलमध्ये घाला, गोळी घाला, पण मी घाबरणार नाही : संजय राऊत
Sanjay Raut Shiv Sena Press confernece Highlights: दुपारी 4 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत शिवसेना कोणता बॉम्ब फोडणार याकडे राज्याचं लक्ष
'माझ्याशी वैर असेल तर मला टॉर्चर करा, कुटुंबियांना का त्रास देता?, हीच का तुमची लोकशाही' असा सवाल पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांना राऊतांनी केला आहे.
आगामी निवडणूकीत 2024 मध्ये देशात परिवर्तन होईल अस यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना PMC घोटाळ्यातील आरोपांखाली तातडीने अटक करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
PMC बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानशी किरीट सोमय्यांचे आर्थिक संबध असून दोघेही पार्टनर असल्याचा मोठा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे. तसंच वाधवान यांनी भाजपला कोट्यवधी रुपये दिल्याचंही राऊतांनी सांगितलं आहे.
संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात मेहंदी, नेल पॉलिश करणाऱ्यांची देखील ईडीकडून चौकशी करण्यात आली असून तिहार जेलमध्ये टाकण्याची धमकी देखील त्यांना देण्यात आली, असं संजय राऊत यांनी सांगितिलं आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांवर हल्लाबोल करताना, 'माझी बँक खाती असलेल्या कार्यालयात ईडीचे लोक गेले' असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
पाटणकरांनी जमीन कशी घेतली, हे सोमय्यांनी दाखवावं, 10 लोकांनी विकल्यानंतर पाटणकरांनी 'ती' जमीन विकत घेतली, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी सोमय्यांच्या आरोपावर दिलं आहे.
'किरीट सोमय्या हा माणूस मराठी द्वेष्टा आहे. त्यानेच मुंबईतील शाळांमध्ये मराठी सक्ती केल्यानंतर कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. आधी त्याचं थोबाड बंद करा. मराठीचा द्वेष करणाऱ्या या माणसाकडून अजून काय अपेक्षा करणार', असं विधान संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.
मागील काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून मविआ नेत्यांवर सुरु असलेल्या आरोपानंतर आज संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका करत, त्यांचा उल्लेख 'मुलुंडचा दलाल' असा केला आहे.
सरकार पडणार नाही असं विधान केल्यानंतर माझ्या जवळपासच्या लोकांवर ईडीचं सत्र सुरु झालं, असा आरोप संजय राऊत यांनी केलं आहे.
सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्रात ठिणगी पडेल, असं वक्तव्य नुकतच संजय राऊत यांनी केलं आहे.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच केंद्रीय यंत्रणांचं संकट महाराष्ट्रासह पश्चिम बंगालवर असल्याचं विधान केलं आहे.
शिवसेना भवनानं अनेक हल्ले परतवले, फक्त हल्ले नव्हे अतिरेकी हल्ले देखील होते, असं नुकतंच संजय राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत पत्रकार परिषदेसाठी शिवसेना भवनात दाखल, कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी, थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुरू होणार
संजय राऊत पत्रकार परिषदेसाठी शिवसेना भवनात दाखल झाले आहेत.
Maharashtra Shiv Sena Sanjay Raut Press Conference : शिवसेना खासदार संजय राऊत यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे. दादर येथील शिवसेना भवनमध्ये संजय राऊत यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेसाठी गर्दी जमली आहे. राज्यभरातील शिवसेना कार्यलयातही शिवसैनिक एकवटले आहेत. मुंबई, पुणे आणि सोलापूरमध्ये शिवसैनिकांनी पोस्टबाजी केली आहे. पुण्यातील शिवसेनेच्या पोस्टरबाजी सध्या चर्चेचा विषय आहे. 105 असंतुष्ट आत्मे अन् एकच संजय राऊत, अशा प्रकारची पोस्टर पुण्यात शिवसैनिकांनी लावली आहेत.
किरीट सोमय्या : सध्या राजकीय वर्तुळात विविध नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीला लक्ष्य केले जात आहे. सोमय्या यांनी काही प्रकरणांमध्ये घोटाळा झाला असल्याचा दावा केला आहे. किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले काही नेत्यांविरोधात ईडीने कारवाई केली आहे. त्यामुळे सोमय्या यांचे एखादे प्रकरण शिवसेना उघडकीस आणणार असल्याचे म्हटले जात आहे.
चंद्रकांत पाटील : शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर सातत्याने चंद्रकांत पाटील यांच्याकडून टीका सुरू असते. चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असून राज्याचे माजी महसूल मंत्रीदेखील होते.
प्रवीण दरेकर : मुंबई बँक घोटाळ्याप्रकरणी प्रविण दरेकर गोवले असल्याचा आरोप करण्यात येतो. दरेकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मुंबई बँकेच्या संचालकपदी असताना त्यांनी घेतलेले काही निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.
चंद्रशेखर बावनकुळे: ओबीसी आरक्षण इतर मुद्यांवरून बावनकुळे यांच्याकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले जात आहे. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात बावनकुळे हे ऊर्जा मंत्री होते.
प्रसाद लाड: कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे प्रसाद लाड हे सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या गोटातले समजले जातात. प्रसाद लाड यांचे काही उद्योग-व्यवसाय आहेत. शिवसेना आणि राज्य सरकारवर त्यांच्याकडून सातत्याने आरोप केले जातात.
गिरीश महाजन: गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जातात. जळगाव जिल्ह्यात भाजपमध्ये असताना एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरू होते. खडसे भाजप यांनी भाजप सोडल्यानंतर त्यांच्याविरोधात ईडीने कारवाई सुरू केली आहे.
देवेंद्र फडणवीस : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित एखादे प्रकरण उजेडात येईल अशी चर्चा सुरू आहे. संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रानंतर पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन इशारा दिला होता.
Shivsena Press Confernce : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे 'साडे तीन' (Three and a half) नेते तुरुंगात जाणार असल्याचा दावा केल्यानंतर ते नेते कोण, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडीवर आरोप करणाऱ्या नेत्यांचा यामध्ये समावेश असण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना नेते संजय राऊत नेमका कोणता गौप्यस्फोट करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने आरोप होत आहेत. ईडीकडे काही नेत्यांची भाजप नेत्यांनी तक्रार दाखल केली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात असून त्यांच्याविरोधात इतरही आरोप आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना पंजाब अॅण्ड महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्या प्रकरणी ईडीने अटक केली. त्यानंतर संजय राऊत यांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून सरकार पाडण्यासाठी सहकार्य करण्यासाठी ईडीकडून धमकी दिली जात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांविरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले होते. आज शिवसेना भवनात होणाऱ्या पत्रकार परिषदेत ही नावं उघड होण्याची शक्यता आहे.
Prasad Lad : संजय राऊत (Sanjay Raut) यांना मी सांगू इच्छितो की, भाजप असल्या खोट्या धमक्यांना घाबरणारा पक्ष नसल्याचे वक्तव्य भाजपचे नेते प्रसाद लाड (Prasad Lad ) यांनी केले आहे. ईडीचे इब्राइच्या बाबतीत जे धाडसत्र चालू आहे, त्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांची झोप उडणार आहे. कोणाची झोप उडणार ते चार वाजण्याच्या आधीच राऊत यांना कळेल असे लाड यावेळी म्हणाले. त्यामुळे राऊत यांनी स्व:ताची झोप वाचवावी असा टोला देखील लाड यांनी राऊतांना लगावला. तसेच राऊत साडेतीन नावाचा चित्रपट काढणार का? हे बघावं लागेल असेही लाड म्हणाले.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Supriya Sule : शिवसेना खासदार संजय राऊत आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेत राऊत नेमके काय गौप्यस्फोट करणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. त्याची उत्सुकता जशी तुम्हा-आम्हाला आहे तशी ती राजकीय नेत्यांनाही आहे. आज पुण्यातल्या एका कार्यक्रमात याचा प्रत्यय आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या एका कार्यक्रमा निमित्त एकाच व्यासपीठावर होते. त्यावेळी दोघांनीही आपल्या भाषणात राऊत यांच्या पत्रकार परिषदेचा उल्लेख केला. सध्या चॅनल आमचे कॉमेंट्स चालवतात मग चॅनलने आम्हाला पैसे द्यायला हवेत. आता आमचं चालेल, आम्ही आता चॅनलवर राहू मात्र, 3 नंतर संजय राऊत सगळे चॅनेल टेक ओव्हर करतील असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले.
आज सायंकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेच्यावेळी शिवसैनिकांची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. नाशिक येथून काही शिवसैनिक मुंबईच्या दिशेने आले आहेत. त्याशिवाय वरळी, दादर, माहिमसह मुंबईतील इतर भागांमधूनही शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. राम गणेश गडकरी चौक, दादर येथे राजकीय कार्यक्रम असल्याने कोतवाल उद्यान ते गडकरी जंक्शन ते राजाबढे चौक दोन्ही मार्गांवर दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाहतूक संथ गतीने चालू राहू शकते. त्यामुळे या वेळेत पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
Shivsena Press Confernce : शिवसेना आणि भाजप यांच्यातील संभाव्य राजकीय संघर्षाचा पुढील अंक आज रंगण्याची चिन्हं आहेत. शिवसेनेच्यावतीने आज दादर येथील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून मुंबईकरांना आवाहन करण्यात आले आहे.
आज सायंकाळी ४ वाजता शिवसेना भवनात होत असलेल्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पोलिस बंदोबस्त वाढवायला सुरुवात झाली आहे. पोलिस अधिकारी, ट्रॅफिक पोलिस अधिकारी दाखल होत तयारीचा आढावा घेत आहे. शिवसेना भवन परिसरातील सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आली असून सर्वेलन्स व्हॅन देखील सेना भवन परिसरात बघायला मिळत आहे. दुपारपासून शिवसेनेचे खासदार, आमदार आणि पदाधिकारी आज शिवसेना भवनात दाखल होणार आहेत.
आज सायंकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेआधीच संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केले आहे. आज होणाऱ्या शिवसेनेच्या पत्रकार परिषदेच्या आधी 'सौ सुनार की एक लोहार की' असे राऊत यांनी म्हणत सूचक वक्तव्य केले. आज संध्याकाळच्या पत्रकार परिषदेत अनेक गोष्टी बाहेर काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. संजय राऊत आज सकाळीच शिवसेना भवनात दाखल झाले. शिवसेनेकडून या पत्रकार परिषदेसाठी खासदार, आमदारही उपस्थित राहणार आहेत.
Sanjay Raut on ED Raids in Mumbai : मुंबईत आज सकाळपासून ईडीने विविध ठिकाणी छापा टाकले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीसंदर्भात काही नेत्यांनी केलेल्या कराराशी निगडीत हे छापासत्र असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे छापे मुंबईच्या सी-वॉर्डमध्ये टाकण्यात आले आहेत. दाऊदचा भाऊ इक्बाल कासरकरचा ताबा घेऊन ईडी आणखी चौकशी करणार असल्याची शक्यता आहे. ईडीच्या छाप्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्राच्या सुरक्षेचा मुद्दा असल्यास सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
आम्ही खूप सहन केलं आम्ही, बर्बाद पण आम्हीच करणार आहोत. डोक्यावरुन खूप पाणी गेलंय? आता बघाच, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहे. तिथं संपूर्ण पक्षासह पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार उपस्थित असतील. मी आताच बोलणार नाही, उद्या सर्व गोष्टींवर उत्तरं मिळतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राऊतांनी म्हटलं की, भाजपचे साडे तीन लोकं हे त्याच (अनिल देशमुखांच्या) कोठडीत असतील. महाराष्ट्रात देखील सरकार आहे, शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार आहे. त्यांची झोप उडाली आहे. जे करायचं ते करा आता मी घाबरणार नाही, असं राऊतांनी म्हटलं आहे.
Sanjay Raut Press Conferance : भाजपच्या साडेतीन नेत्यांना जेलमध्येही जावं लागणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत. आम्ही खूप सहन केलं आहे. त्यामुळे आता बरबादही आम्हीच करू, असा इशारा राऊत यांनी दिला. दरम्यान भाजपचे हे साडेतीन नेते कोण? हे आजच्या पत्रकार परिषदेत कळणार आहे.
आम्ही खूप सहन केलं आम्ही, बर्बाद पण आम्हीच करणार आहोत. डोक्यावरुन खूप पाणी गेलंय? आता बघाच, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहे. तिथं संपूर्ण पक्षासह पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार उपस्थित असतील. मी आताच बोलणार नाही, उद्या सर्व गोष्टींवर उत्तरं मिळतील, असं संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे.
पार्श्वभूमी

संजय राऊतांनी म्हटलं की, भाजपचे साडे तीन लोकं हे त्याच (अनिल देशमुखांच्या) कोठडीत असतील. महाराष्ट्रात देखील सरकार आहे, शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार आहे. त्यांची झोप उडाली आहे. जे करायचं ते करा आता मी घाबरणार नाही, असं राऊतांनी म्हटलं होतं.
Shivsena : शिवसेनेच्या निशाण्यावर असणारे भाजपचे 'ते' साडेतीन नेते कोण? 'या' नावांची चर्चा
Shivsena Press Confernce : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे 'साडे तीन' (Three and a half) नेते तुरुंगात जाणार असल्याचा दावा केल्यानंतर ते नेते कोण, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडीवर आरोप करणाऱ्या नेत्यांचा यामध्ये समावेश असण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना नेते संजय राऊत नेमका कोणता गौप्यस्फोट करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने आरोप होत आहेत. ईडीकडे काही नेत्यांची भाजप नेत्यांनी तक्रार दाखल केली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात असून त्यांच्याविरोधात इतरही आरोप आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना पंजाब अॅण्ड महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्या प्रकरणी ईडीने अटक केली. त्यानंतर संजय राऊत यांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून सरकार पाडण्यासाठी सहकार्य करण्यासाठी ईडीकडून धमकी दिली जात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांविरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले होते. आज शिवसेना भवनात होणाऱ्या पत्रकार परिषदेत ही नावं उघड होण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -