एक्स्प्लोर

Supriya Sule : दादा आत्ताच आपली पब्लिसिटी करु, दुपारनंतर राऊत सगळे चॅनल टेक ओव्हर करतील : सुप्रिया सुळे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते. त्यावेळी दोघांनीही आपल्या भाषणात संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेचा उल्लेख केला.

Supriya Sule : शिवसेना खासदार संजय राऊत आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेत राऊत नेमके काय गौप्यस्फोट करणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. त्याची उत्सुकता जशी तुम्हा-आम्हाला आहे तशी ती राजकीय नेत्यांनाही आहे. आज पुण्यातल्या एका कार्यक्रमात याचा प्रत्यय आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या एका कार्यक्रमा निमित्त एकाच व्यासपीठावर होते. त्यावेळी दोघांनीही आपल्या भाषणात राऊत यांच्या पत्रकार परिषदेचा उल्लेख केला. सध्या चॅनल आमचे कॉमेंट्स चालवतात मग चॅनलने आम्हाला पैसे द्यायला हवेत. आता आमचं चालेल, आम्ही आता चॅनलवर राहू मात्र, 3 नंतर संजय राऊत सगळे चॅनेल टेक ओव्हर करतील असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले.

तुम्ही तुमचं चॅनल आमच्या कॉमेंट्सवर चालवता. मग तुम्ही आम्हाला पैसे द्यायला हवेत असे सुळे यावेळी म्हणाल्या. मात्र, आता जे काही करायचे आहे ते तीन वाजण्याच्या आत करु, 3 नंतर संजय राऊत सगळे चॅनल टेक ओव्हर करतील असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 3 नंतर संजय राऊत यांचा सिक्सर आहे. त्यामुळे दादा आपण आत्ताच आपली पब्लिसिटी करु असे सुप्रिया सुळे चंद्रकांत पाटील यांना उद्देशून म्हणाल्या. आपण वाट बघू संजय राऊत काय बोलतात ते. ते काही तरी महत्त्वाचेच बोलतील असे वाटते, कारण त्यांनी इशारा दिला आहे.  सगळा देश त्यांना बघणार आहे. मी पण बघणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांचा राज्यसभेच्या खासदार सुप्रिया सुळे असा उल्लेख केला. नंतर मात्र, ते लोकसभेच्या खासदार म्हणाले. काल दत्ता मामा भरणे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणाले. आज मी तुम्हाला असं बोललो असे पाटील म्हणाले. आज सकाळपासूनच सारे चॅनलवाले मला विचारत आहेत की, संजय राऊत काय बोलणार. राऊत काय बोलणार हे मला कसं कळणार? असे पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget