Sanjay Raut : फडणवीस मदारी, ते डमरू वाजवतायत, इतर दोघे नाचतायत; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर हल्लाबोल
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून सरकारवर सडकून टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस मदारी असून, ते वाजवतायत आणि इतर दोघे नाचतायत, असा टोला लगावला आहे.
![Sanjay Raut : फडणवीस मदारी, ते डमरू वाजवतायत, इतर दोघे नाचतायत; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर हल्लाबोल Sanjay Raut criticize statement on devendra fadanvis eknath shinde and ajit pawar and state government Maharashtra News Updates Sanjay Raut : फडणवीस मदारी, ते डमरू वाजवतायत, इतर दोघे नाचतायत; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/eeb32e81fe3ae048d2b52c20e2f979651673091417283441_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून सरकारवर सडकून टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस मदारी असून, ते वाजवतायत आणि इतर दोघे नाचतायत, असा टोला लगावला आहे. तर सरकारच्या नाड्या दिल्लीमध्ये आहेत. त्यामुळे वारंवार दिल्लीला जावं लागतंय, अशीही टीका राऊतांनी केली आहे. मुख्यमंत्री कुठे आहेत? असा प्रश्न विचारल्यास ते कायम दिल्लीत दिसतात. इथे राज्यात बेसावध आरोग्य व्यवस्थेमुळे लोकांचे जीव चालले आहेत, हे दिल्लीत गेले आणि इथे सरकार कोण चालवणार? असा सवाल उपस्थित करत संजय राऊतांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे.
"सरकार दिल्लीतून ईडी आणि सीबीआयने आणलं"
ते म्हणाले की, महाराष्ट्रातील सरकार ना देवेंद्र फडणवीसांनी आणलं आहे. ना अजित पवारांनी आणलं आहे आणि ना एकनाथ शिंदेंनी आणलं आहे. हे सरकार दिल्लीतून ईडी आणि सीबीआयने आणलं आहे. अजित पवार पळून जाण्याचं कारण शरद पवारांनी सांगितलं आहे. ईडी आणि सीबीआयच्या भीतीनं पळून गेले आहेत.
मुख्यमंत्री कुठे आहे?
मुख्यमंत्री कुठे आहे असं विचारल्यास ते कायम दिल्लीत असल्याचं दिसत आहे. कधी अमित शहांशी रात्री 12 वाजता बैठक घेतात तर कधी जे पी नड्डांना भेटतात. मुख्यमंत्री स्वत:ला बाळासाहेब ठाकरेंचे चेले म्हणवता आणि जे पी नड्डांच्या स्वागताचे बोर्ड लावता. ही लाचारी पत्करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवरआली आहे, असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदेंची शिवसेना ही चॅयना मेड माल झाली आहे. ही राज्याची नाही तर ही चायनाची शिवसेना असल्याचंही ते म्हणाले. शिवसेना फोडण्याची हिंम्मत अमित शहांमधेय नाही. ई़डी आणि सीबीआयने ही शिवसेना फोडली असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला.
आरोग्य व्यवस्थेवर सडकून टीका
राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची अवस्था अत्यंत बिकट आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही कोरोनाशी सामना केला. कोरोनाकाळातील राज्याचे मुख्यमंत्री आणि मुंबई महानगरपालिकेने उत्तम काम केल्याने जगाने आम्हाला मानांकन दिलं आहे. धारावी सारखा भाग मुंबईत असताना कोरोना रोखला आहे, असं बोलत त्यांनी राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर सडकून टीका केली आहे.
साखर कारखानदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप
देवेंद्र फडणवीस यांचे उजवे हात आणि भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या दौंडच्या भिमा पाटस सहकारी साखर कारखान्यात 500 कोटींचं मनी लॉंड्रिंग आहे. गिरडा महोत्सव सहकारी साखर कारखाना 167 कोटींचं मनी लॉंड्रिंग आहे. दादा भुसे तेथील मंत्री आहेत. या सगळ्यात शेतकऱ्यांचे पैसे गेले आहेत. त्यासोबतच हसन मुश्रीफांना सगळे तुरुंगात पाठवायच्या तयारीत होते. मात्र आता ते तुरुंगात न जाता मंत्रिमंडळात गेले आहेत. अनेक साखर कारखानदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
राम मंदिर बांधल्याने कोणी राम होत नाही
राम मंदिर बांधल्याने कोणी राम होत नाही. अयोध्येत रामाचं मंदिर भारतातील नागरिक बांधत आहे आणि भाजपच्या कामाची जी पद्धत आणि दिशा आहे ती रावणाला शोभणारी आहे. आपल्या राज्यात रावण अत्याचार करत होता आज तसाच अत्याचार सरकार राज्यात आणि दिल्लीत करत असल्याचं ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)