एक्स्प्लोर

फडणवीसांच्या आयुष्यात खरा भूकंप, शिंदेंच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली हे त्यांच्या कर्माचे फळ; संजय राऊतांचा 'रोखठोक' हल्लाबोल

Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनामधील आपल्या 'रोखठोक' सदरातून बंडखोर शिवसेना नेत्यांवर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनामधील आपल्या 'रोखठोक' सदरातून बंडखोर शिवसेना नेत्यांवर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले हाच खरा भूकंप आहे, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. फडणवीस पुन्हा आले, पण ते असे 'अर्धवट' येतील असे कुणालाच वाटले नव्हते! आता राज्यात काय होणार? असंही त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राचे राजकारण हे आता आदर्श राहिलेले नाही. त्याची खिचडी झाली आहे. सध्या नवे राज्य आले आहे. ज्यांनी ते आणले ते सुखात नांदोत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडले, पण राज्यातील लोक त्यांच्या सत्तात्यागाने हळहळले. ठाकरे यांनी हेच कमवले. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद मिळविले. या सगळ्यात फडणवीसांच्या आयुष्यात भूकंप झाला, असं रोखठोकमध्ये म्हटलं आहे. 

संजय राऊत यांनी लेखात म्हटलं आहे की, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याने महाराष्ट्रातील एक पर्व संपले. जेमतेम अडीच वर्षांचाच हा कालखंड, पण बुधवारी रात्री मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन ते मुक्त झाले. पाच वर्षांसाठी स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षांतच कोसळले, ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमुळे नाही. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देताना सांगितले, ''माझ्याच लोकांनी दगा दिला.'' चाळीस आमदारांपैकी काहींनी आधी शिवसेनेचा राज्यसभेचा उमेदवार पाडला व याच गटाने भारतीय जनता पक्षाचा पाचवा उमेदवार विधान परिषदेत विजयी केला. दगाबाजीची ही बीजे रोवली जात असताना मुख्यमंत्री याच लोकांवर कुटुंबाचे घटक म्हणून विश्वास ठेवून होते. एका महानाट्यात छत्रपती शिवरायांच्या तोंडी एक ज्वलंत वाक्य आहे. छत्रपती सांगतात, ''शत्रूची फौज कधीच मोजू नका. आपल्यातील फितूर किती ते मोजा!''

राज्यपाल महोदयांनी या घटनाबाह्य कृतीचे 'पेढे' खाल्ले!

ते लेखात पुढं म्हणतात, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर किती आमदार आहेत ते सोडा, पण हे सर्व आमदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी झाले व त्यांनीच उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले. पक्षांतरबंदीविरोधी कायद्याने त्यांची आमदारकी जाऊ शकते, पण महाराष्ट्राचे राज्यपाल व सर्वोच्च न्यायालयाने पक्षांतर करणाऱ्यांना बळ दिले. जर कोणाला पक्ष बदलायचा असेल तर त्याने जनतेच्या नजरेसमोर बदलला पाहिजे. त्याच्यात जनतेला तोंड देण्याचे सामर्थ्य असले पाहिजे. आमच्या लोकशाहीला तेव्हाच बळ लाभेल की, जेव्हा पक्ष बदलणारा राजीनामा देऊन पुन्हा जनतेत जाईल. तसे न करणाऱ्यांना कायद्याने बाद केले पाहिजे आणि पक्षांतरबंदी कायद्याची बूज राखली पाहिजे. मात्र महाराष्ट्रात वेगळे घडवले गेले. पक्ष बदलणाऱ्या अपात्र ठरण्याची शक्यता असलेल्या आमदारांनी महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य ठरवले आणि राज्यपाल महोदयांनी या घटनाबाह्य कृतीचे 'पेढे' खाल्ले!

लेखात आणखी काय काय लिहिलंय

दीपक केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. त्यांना अचानक हिंदुत्वाचा आणि भाजपचा पुळका आला हे समजण्यासारखे आहे, पण केसरकर ज्या सावंतवाडी मतदारसंघातून 2019 ला निवडून आले तेथे भाजपबरोबर युती असतानाही केसरकरांविरोधात राजन तेली हा बंडखोर भाजपने उभा केला होता व त्यांच्या प्रचारासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत स्वतः आले. 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे 30 उमेदवार भाजपने बळ दिलेल्या बंडखोरांमुळे पडले. शिवसेनेच्या आमदारांची संख्या कमी व्हावी व मुख्यमंत्रीपदावरील शिवसेनेचा दावा कमजोर व्हावा यासाठीच ही खेळी होती. शिंदे गटात आज सामील असलेल्या किमान 17 आमदारांना भाजपने सरळ पाडण्याचे प्रयत्न केले हे सत्य आहे. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे, 40 आमदारांनी नक्की कोणत्या कारणामुळे पक्ष सोडला? त्यांनी व त्यांच्या प्रवक्त्यांनी सतत वेगळी कारणे दिली.

1) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या आमदारांना भेटत नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांची कामे होतात. या कारणांमुळे पक्ष सोडला असे सांगणे चुकीचे आहे. अजित पवार त्यांच्या आमदारांची कामे करतात. त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी करावीत म्हणून मुख्यमंत्री ठाकरे यांनी नगरविकास, समृद्धी महामार्गासारखी मलईदार खाती शिंदे यांना दिली. ही पक्षाचीच घडी होती. ती विस्कटवली कोणी?

2) शिवसेना आमदारांना निधी दिला नाही हे आणखी एक कारण दिले गेले. त्याचं खणखणीत उत्तर जयंत पाटील यांनी दिलं. पाटलांनी शिवसेना बंडखोरांच्या मतदारसंघांतील निधीवाटपाची यादीच वाचून दाखवली. अनेक प्रमुख बंडखोरांच्या मतदारसंघांत 150 ते 250 कोटींपर्यंत निधी देण्यात आला. शिवसेना-भाजपचे सरकार असताना शिवसेनेच्या मतदारसंघात फक्त 6 टक्के तर भाजपच्या मतदारसंघामध्ये 90-95 टक्के निधी जायचा असे पाटील सांगतात, ते खरेच आहे.

3) दीपक केसरकर सांगतात, महाराष्ट्रात जे घडले त्यास संजय राऊत जबाबदार आहेत? शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला हा काय गुन्हा झाला?

4) किमान 16 आमदार 'ईडी' व इतर वैयक्तिक कारणांमुळे पळाले. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार हे अनैसर्गिक आहे असे जे म्हणतात त्यांचे येणारे सरकार त्याहून जास्त अनैसर्गिक असणार आहे.

महाराष्ट्रात भूकंप झाला व असा भूकंप राजकारणात कधी झालाच नव्हता असे वर्णन एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत झाले, पण त्या बंडापेक्षा मोठा भूकंप नऊ दिवसांनी झाला. शिंदे यांच्या बंडामागचे चाणक्य म्हणून संपूर्ण मीडिया देवेंद्र फडणवीस यांना श्रेय देत होता, पण सत्य वेगळेच होते. हे बंड थेट दिल्लीच्या सूत्रधारांनी घडवले आणि महाराष्ट्रातील भाजप त्याबाबत पूर्ण अंधारात होता. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असे जे बोलत होते ते नंतर कोसळले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले व देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री व्हावे असे फर्मान भाजप हायकमांडने सोडले. हाच खरा भूकंप आहे. पुन्हा मुख्यमंत्री होण्याची झेप फडणवीस यांच्या दिल्लीतील नेत्यांनी रोखली व शिंदे यांना बळ दिले. फडणवीस यांच्यासाठी हा धक्का आहे. महाराष्ट्र भाजपचे एकतर्फी नेतृत्व फडणवीस यांच्या हाती होते, पण अमित शाह आणि फडणवीसांत सख्य नव्हते. ''मला उपमुख्यमंत्रीपद नको. चंद्रकांत पाटील यांना ते द्या. मला भाजप प्रदेशाध्यक्ष करा'', अशी त्यांची विनंती शेवटच्या क्षणी फेटाळण्यात आली. कधी काळी आपलाच ज्युनियर मंत्री असलेल्या शिंदे यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ फडणवीस यांच्यावर आली. हे त्यांच्या कर्माचे फळ आहे. 2019 मध्ये सत्तेचा 50-50 टक्के फॉर्म्युला त्यांनी स्वीकारला नाही व महाविकास आघाडीचे सरकार त्यामुळे निर्माण झाले. उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे मुख्यमंत्री झाले व आता बंडखोर शिवसैनिक शिंदे यांना हे पद भाजप हायकमांडने दिले. काळाने फडणवीसांवर घेतलेला हा सूड आहे, असं लेखात शेवटी म्हटलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai crime: फुकटात लोकल प्रवासासाठी Chat GPT वापरलं; बनावट रेल्वे पास बनवला अन् डाव फसला; मुंबईत 22 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल 
फुकटात लोकल प्रवासासाठी Chat GPT वापरलं; बनावट रेल्वे पास बनवला अन् डाव फसला; मुंबईत 22 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल 
भारताचा तिसऱ्या टी 20 श्रीलंकेवर दणदणीत विजय, शफाली वर्माची वादळी फलंदाजी, मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी
शफाली वर्माची वादळी फलंदाजी, भारताचा श्रीलंकेवर 8 विकेटनं विजय, आणखी एक मालिका जिंकली
Dhule Municipal Corporation Election 2026 : धुळे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम, भाजपकडे मोठ्या संख्येनं इच्छुक, काँग्रेस आव्हान देणार? मतदारांची संख्या, वॉर्डनिहाय आरक्षण सर्व माहिती
धुळे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम, भाजपकडे मोठ्या संख्येनं इच्छुक, काँग्रेस आव्हान देणार? संपूर्ण माहिती
Pune : मोठी बातमी! घड्याळ की तुतारी? दोन्ही राष्ट्रवादीची पुण्यातील युती फिस्कटली, चिन्हावरून मतभेद झाल्याची सूत्रांची माहिती
मोठी बातमी! घड्याळ की तुतारी? दोन्ही राष्ट्रवादीची पुण्यातील युती फिस्कटली, चिन्हावरून मतभेद झाल्याची सूत्रांची माहिती

व्हिडीओ

Khopoli Crime खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची हत्या, राजकीय सूडापोटी मंगेश काळोखेंची हत्या?
Sudhir mungantiwar Vs Jorgewar : जोरगेवार-मुनगंटीवारांमधला सुप्त संघर्ष कधी संपणार? Special Report
Ganpati Santa Claus : गणपतीला सांताक्लॉजची टोपी घातल्यानं वादंग Special Report
Mahayuti Seat Sharing : मनपासाठी महायुतीचं कुठे ठरलं कुठे अडलं? Special Report
Social Media Ban Update : भारतातही 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंदी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai crime: फुकटात लोकल प्रवासासाठी Chat GPT वापरलं; बनावट रेल्वे पास बनवला अन् डाव फसला; मुंबईत 22 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल 
फुकटात लोकल प्रवासासाठी Chat GPT वापरलं; बनावट रेल्वे पास बनवला अन् डाव फसला; मुंबईत 22 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल 
भारताचा तिसऱ्या टी 20 श्रीलंकेवर दणदणीत विजय, शफाली वर्माची वादळी फलंदाजी, मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी
शफाली वर्माची वादळी फलंदाजी, भारताचा श्रीलंकेवर 8 विकेटनं विजय, आणखी एक मालिका जिंकली
Dhule Municipal Corporation Election 2026 : धुळे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम, भाजपकडे मोठ्या संख्येनं इच्छुक, काँग्रेस आव्हान देणार? मतदारांची संख्या, वॉर्डनिहाय आरक्षण सर्व माहिती
धुळे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम, भाजपकडे मोठ्या संख्येनं इच्छुक, काँग्रेस आव्हान देणार? संपूर्ण माहिती
Pune : मोठी बातमी! घड्याळ की तुतारी? दोन्ही राष्ट्रवादीची पुण्यातील युती फिस्कटली, चिन्हावरून मतभेद झाल्याची सूत्रांची माहिती
मोठी बातमी! घड्याळ की तुतारी? दोन्ही राष्ट्रवादीची पुण्यातील युती फिस्कटली, चिन्हावरून मतभेद झाल्याची सूत्रांची माहिती
Ajit Pawar : अजितदादा भाजपसाठी 'ट्रोझन हॉर्स'? भाजप विरोधी, धर्मनिरपेक्ष मतं घेऊन विरोधकांची स्पेस संपवून टाकण्याची रणनीती
अजितदादा भाजपसाठी 'ट्रोझन हॉर्स'? भाजप विरोधी, धर्मनिरपेक्ष मतं घेऊन विरोधकांची स्पेस संपवून टाकण्याची रणनीती
BMC Election 2025-26 : उद्धव ठाकरे- राज ठाकरे, भाजप अन् शिवसेनेपूर्वी समाजवादी पार्टीनं आघाडी घेतली, मुंबई महापालिकेसाठी पहिली यादी जाहीर
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, समाजवादी पक्षाकडून मोठी घोषणा
हे सरकार परवडणारे आहे का? आपण पाण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला, दाखवण्यासारखं काही नाही म्हणून जातीय तेढ निर्माण करतात; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
हे सरकार परवडणारे आहे का? आपण पाण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला, दाखवण्यासारखं काही नाही म्हणून जातीय तेढ निर्माण करतात; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
केरळमध्ये भाजपचा पहिला महापौर विराजमान; राज्यातील पहिल्या निवृत्त महिला आयपीएस अधिकाऱ्याची चर्चा असताना कोणाला संधी मिळाली?
केरळमध्ये भाजपचा पहिला महापौर विराजमान; राज्यातील पहिल्या निवृत्त महिला आयपीएस अधिकाऱ्याची चर्चा असताना कोणाला संधी मिळाली?
Embed widget