एक्स्प्लोर

Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश, विधानसभा लढवणार

Sanjay Pandey Joins Congress : ईडी आणि सीबीआयने आपल्याला कथित फोन टॅपिंग प्रकरणात आपल्याला गुंतवलं असून त्याचा आणि काँग्रेस प्रवेशाचा काही संबंध नसल्याचं संजय पांडे यांनी स्पष्ट केलं. 

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता काहीच दिवसात लागण्याची शक्यता असून राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसतंय. काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. संजय पांडे यांची विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा अशून जागावाटपानंतर त्यावर निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे संजय पांडे चर्चेत आले होते. त्यांच्यावर ईडीने खटलाही भरला आहे. 

संजय पांडे यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या चार उमेदवारांची घोषणा केली होती. तसेच ते स्वतः वर्सोवा किंवा अंधेरीतून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आता उमेदवारीचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चा आहे. 

निवडणूक लढण्यावर ठाम 

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर संजय पांडे म्हणाले की, मी विधानसभा निवडणूक लढवणार हे नक्की आहे. ⁠या संदर्भात पक्ष निर्णय घोईल. ⁠ईडी, सीबीआयचा मी ही व्हिक्टीम आहे. ⁠या संदर्भात कोर्टात केस लढेन. ⁠या प्रकरणाचा आणि काँग्रेस प्रवेश याचा काहीही संबंध नाही. 2004 पासून मला काँग्रेस मध्ये काम करायचं होतं. ⁠मात्र आता वेळ आहे म्हणून मी काम करत आहे. जागावाटपानंतर कोणत्या ठिकाणाहून लढायचं ते ठरवू. 

संजय पांडेंची पोस्ट आली होती चर्चेत

दरम्यान, संजय पांडे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केल्याचे म्हटले होते. "कुठलाही पक्ष नाही, पण आम्ही प्रयत्न करू…”, अशी पोस्ट संजय पांडे यांनी केली होती. संजय पांडे यांच्या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. 

फोन टॅपिंग प्रकरण काय? ( Sanjay Pandey Mumbai Phone Tapping Case) 

बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात संजय पांडेंना अटक करण्यात आली होती. संजय पांडे यांच्या कंपनीने जवळपास आठ वर्षे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) कर्मचार्‍यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याची माहिती सीबीआयला (CBI) मिळाली होती. संजय पांडे यांच्या ISEC सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने रेड सर्व्हर नावाच्या उपकरणांचा वापर करून हे फोन टॅप केल्याचा आरोप सीबीआय आणि ईडीने केला होता. याचप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना अटक करण्यात आली होती.  

संजय पांडे ज्यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक होते, तेव्हा त्यांनी परमबीर सिंह यांना अनिल देशमुख यांच्याविरोधात तक्रार मागे घेण्यासाठी दबाव निर्माण केला असल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तसेच, NSE सर्व्हर कॉप्रमाईज केस प्रकरणात त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं. 

चित्र रामकृष्णा प्रकरणात एक ऑडिट कंपनी तयार करण्यात आली होती, ही कंपनी संजय पांडे यांची होती. या प्रकरणात बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. तसेच संजय पांडे यांनी 2001 मध्ये आयटी ऑडिट फर्म सुरू केली होती. त्यानंतर जेव्हा त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही तेव्हा ते पुन्हा पोलीस सेवेत आले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाला आणि आईला फर्ममध्ये संचालक केलं. 

Isec Services Pvt Ltd नावाच्या फर्मला 2010 आणि 2015 च्या दरम्यान NSE सर्व्हर आणि सिस्टम्सचे IT ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. सीबीआय आणि ईडीनं त्यांच्या फर्मची चौकशी सुरू केली होती. चौकशीनंतर संजय पांडेंना अटक करण्यात आली. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RR vs KKR : केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
RBI :आरबीआयचा एचडीएफसी सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड ठोठावला, कारण समोर
रिझर्व्ह बँकेचा HDFC सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड भरण्याचे आदेश, कारण समोर
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 26 March 2025Special Report | Santosh Deshmukh | मास्टरमाईंड हत्येचा वाल्मिक कराडच! खटला ट्रॅकवर, न्याय लवकर?Special Report|Opposition Leader | संपला कालावधी निवड कधी? विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद रिक्तच राहणार?Special Report | Kunal Kamra | गाण्यावरुन वादंग, कामरावर हक्कभंग; अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटी सभागृहात गोंधळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RR vs KKR : केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
RBI :आरबीआयचा एचडीएफसी सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड ठोठावला, कारण समोर
रिझर्व्ह बँकेचा HDFC सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड भरण्याचे आदेश, कारण समोर
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
IPL 2025 : रिषभ अन् गोयंकांच्या चर्चेमुळं राहुलची आठवण,आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का? BCCI चे नियम नेमके काय सांगतात?
रिषभ पंत अन् संजीव गोयंकांच्या चर्चेमुळं केएल राहुलची आठवण, आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का?
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
Embed widget