MNS : 19 वर्षे आमच्याशी युतीचं सूचलं नाही, मग आताच उत्साह का वाढला? शरद पवारांसोबत जाताना कार्यकर्त्यांना विचारलं होतं का? संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना प्रश्न
Sandeep Deshpande PC : या आधी आम्ही दोन वेळा युतीसाठी प्रस्ताव पाठवला होता, त्यावेळी शिवसैनिकांनी आणि उद्धव ठाकरेंनी उत्साह का दाखवला नाही असा प्रश्न मनसेचे संदीप देशपांडे यांनी विचारला.

मुंबई : मनसेची स्थापना होऊन 19 वर्षे झाली, पण या आधी आमच्याशी कधीही युतीचं सूचलं नाही. मग आताच का उत्साह वाढलाय? असा प्रश्न मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. विधानसभेत जर 20 ऐवजी 60 जागा आल्या असत्या तर आमच्याशी युती करण्याचा विचार तरी केला असता का? असाही प्रश्न त्यांनी विचारला. उद्धव ठाकरेंच्या पक्षाची अवस्था आता बिकट आहे म्हणून त्यांना युतीचं सूचलं असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्याच्या आणि कार्यकर्त्यांच्या जे मनात आहे तेच मी करणार असं सांगत उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युतीचे जाहीर संकेत दिले. त्यानंतर आता मनसेकडून प्रतिक्रिया आली आहे. संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाशी संभाव्य युतीवरून उद्धव ठाकरेंना कठोर सवाल विचारले आहेत.
Sandeep Deshpande : शरद पवार जाऊ काय असं विचारलं होतं का?
मनसेसोबत जायचं का असं उद्धव ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विचारत आहेत. त्यावरही संदीप देशपांडे यांनी टीका केली. या आधी कधी विचारले का शरद पवारांसोबत जाऊ का? काँग्रेससोबत जाऊ का? तेव्हा बैठका घेतल्या का आमदारांच्या बैठका?
MNS Shiv Sena Alliance : दोन वर्षांपूर्वी उत्साह का दाखवला नाही?
तुमच्या पक्षावर वाईट वेळ आली आहे मान्य आहे. पक्ष वाचविण्यासाठी हे सर्व करत आहात. पण युतीसाठी आमच्यावर दबाव टाकू नका. या युतीसाठी दोन वर्षांपूर्वी उत्साह का दाखवला नाही. आम्ही दोन वेळा युतीचा प्रस्ताव पाठवला होता, त्यावेळी शिवसैनिकांनी उत्साह का दाखवला नाही. या आधीही मनसे आणि शिवसेनेने एकत्र यावेत असे बॅनर लावण्यात आले होते. त्यावेळी युतीसाठी पुढे का आला नाही? आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर सहन करणार नाही असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.
Hindi Compulsion In Maharashtra : हिंदी सक्तीला विरोध, आंदोलन उभारणार
संदीप देशपांडे म्हणाले की, "हिंदी भाषेची आडमार्गाने सक्ती करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात आहे. त्याला विरोध करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. येणाऱ्या काळात आंदोलन होईल, सह्यांचे कार्यक्रम होतील, जनजागृती केली जाईल. शाळांच्या बाजूला कॉर्नर चर्चा होतील. राष्ट्रीय धोरणात कुठेही तीन भाषांचा उल्लेख नाही. इतर राज्यात असे काही नाही. उत्तर भारत असो किंवा गुजरात असो, तिथे असे काही नाही. देवेंद्र फडणवीस हे चुकीची माहिती देत आहे. पुस्तक जाळण्याचे आम्ही समर्थन करत नाही, हे चुकीचं आहे. आम्ही मुख्याध्यापकांना जाब विचारत नाही. आम्ही त्यांना सांगत आहोत की या लढ्यात आम्हाला त्यांनी साथ द्यावी. राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवे. शिक्षक हा राज्य सरकारचा गुलाम नाही. समाजात जे घडत आहे त्याला चाप बसविण्यासाठी त्यांनी पुढे आले पाहिजे."
ही बातमी वाचा:























