एक्स्प्लोर
आशिष खेतान यांना धडा शिकवू: सनातन संस्था
मुंबई : आशिष खेतान सीबीआयच्या कारवाईपूर्वी ट्वीट करतात आणि मग कारवाई होते, हे पूर्वनियोजित षड्यंत्र आहे. आशिष खेतानच्या तालावर सीबीआय काम करते, असा आरोप सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला आहे.
यावेळी, संजीव पुनाळेकर म्हणाले, “आशिष खेतान यांना धडा शिकवू.” मात्र, पत्रकरांनी त्यावर पुन्हा प्रश्न केल्यानंतर संजीव पुनाळेकरांनी सारवासारव केली आणि म्हणाले, “आशिष खेतान यांना सनदशीर मार्गाने धडा शिकवू”
“डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआय अनेकदा सनातनच्या आश्रमात चौकशीसाठी येऊन गेली. आजही सीबीआयची टीम नियमित चौकशीसीठी आश्रमात आली होती. मात्र, आज आशिष खेतानने सीबीआयची टीम चौकशीसाठी येण्याआधी ट्वीट केला. सीबीआय;r टीम येण्याआधी; खेतान ट्वीट करताl म्हणजे us पूर्वनियोजित षड्यंत्र आहे”, असे अभय वर्तक म्हणाले.
सीबीआय जाणीवपूर्वक सनातनला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, असाही आरोप सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला आहे. शिवाय, सीबीआय अधिकारी नंदकुमार नायर यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणीही सनातनने गृहमंत्र्यांकडे केली आहे.
सनातनचे साधक सारंग अकोलकर यांच्या घरी सीबीआय विनापरवानगी जाऊन घरात तोडफोड केली. याविरोधात अकोलकर यांच्या कुटुंबाने पोलीस तक्रार केली आहे, अशी माहितीही वर्तक यांनी दिली.
“मडगाव ब्लास्टचा आरोपी सारंग अकोलकर आणि रुद्र गौडा-पाटील आमच्या संपर्कात आहेत. मात्र, आम्हाला सरकारवर विश्वास नसल्याने ते आतापर्यंत समोर आलं नाही. शिवाय, आम्हीही त्यांना समोर न येण्याचा सल्ला दिला आहे.”, असे सनातनचे संजीव पुनाळेकर म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement