एक्स्प्लोर

Samruddhi Mahamarg : फक्त एक महिना उरला, समृद्धी महामार्गाचं काम संपल्यात जमा; आता नागपूर-मुंबई प्रवास फक्त 8 तासांत

Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे. नवीन वर्षात हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. नव्या वर्षात नागपूर-मुंबई प्रवास फक्त 8 तासांत शक्य होईल.

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर प्रवासृ अवघ्या 8 तासांवर आणणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) शेवटच्या टप्प्याचं काम 100 टक्के पूर्ण झालं आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी-आमणे या शेवटच्या टप्प्याचं काम अखेर पूर्ण झालं असून आता फक्त फिनिशिंग बाकी आहे. या अनुषंगाने नव्या वर्षात, म्हणजेच जानेवारी 2025 मध्ये हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचं (MSRDC) नियोजन आहे.

नव्या वर्षात नागपूर-मुंबई प्रवास फक्त 8 तासांत

समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नागपूर-मुंबई प्रवास केवळ 8  तासांत पार करता येणार आहे. नागपूर-मुंबईला जोडणारा समृद्धी महामार्ग एकूण 701 किमी लांबीचा आहे. त्यापैकी 652 किमी लांबीचा मार्ग आतापर्यंत दोन टप्प्यात सुरू झाला आहे. यामुळे इगतपुरी-नागपूर-इगतपुरी हा भाग सहा ते सात तासांत जोडला गेला आहे. आता उर्वरित आणि अखेरचा टप्पा सुरू होण्याची प्रतीक्षा असतानाच हा मार्ग देखील जानेवारीत खुला होईल, असं आश्वासन देण्यात आलं आहे.

डिसेंबरपर्यंत फिनिशिंगची कामं उरकणार

नागपूर-मुंबई प्रवासाचं अंतर 16 तासांवरून केवळ 8 तासांवर आणण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. समृद्धी महामार्गाचे दोन टप्पे तर सुरू झाले, मात्र शेवटच्या टप्प्यास काही कारणामुळे विलंब झाला. यानंतर हा इगतपुरी-आमणे मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. शेवटच्या टप्प्याचं काम 100 टक्के पूर्ण झालं आहे. सध्या फिनिशिंगची कामं वेगात सुरू असून ही कामं डिसेंबर अखेरीस पूर्ण होतील. हे काम पूर्ण झाल्यानंतर नव्या वर्षात म्हणजेच, जानेवारीत हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होईल, अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

इगतपुरी ते भिवंडी अंतर केवळ 40 मिनिटांत

इगतपुरी-आमणे टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास इगतपुरी ते आमणे, म्हणजेच इगतपुरी ते भिवंडी अंतर केवळ 40 मिनिटांत पार करता येणार आहे. आजच्या घडीला हे अंतर पार करण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात. त्यामुळे हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

समृद्धी महामार्गावर गुळगुळीत टायरला बंदी

महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे गेल्या वर्षभरात तब्बल 15 हजारांहून अधिक वाहनांच्या टायरची तपासणी करण्यात आली. यानंतर अपघात रोखण्यासाठी गुळगुळीत टायर असलेल्या 500 पेक्षा अधिक वाहनांना समृद्धी महामार्गावर प्रवेश बंदी करण्यात आली. त्यामुळे वाहनांची आणि टायरची स्थिती चांगली नसल्यास समृद्धी महामार्गावर जाण्याचे धाडस करू नये, असं आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा:

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर गुळगुळीत टायरला बंदी, एन्ट्री पॉइंट्सवर तपासणी

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Ghatkoper Ashok Nagar Landslide: मुंबईच्या घाटकोपरमधील गौसिया चाळीवर डोंगराचा भाग कोसळला; 2 जणांचा मृत्यू, अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू
मुंबईच्या घाटकोपरमधील गौसिया चाळीवर डोंगराचा भाग कोसळला; 2 जणांचा मृत्यू, अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Embed widget