एक्स्प्लोर

मुंबईकरांनी घाबरण्याची गरज नाही, संपूर्ण समुद्रात सागर कवच प्रोग्रॅम सुरू; मुंबई पोलीस आयुक्तांची माहिती  

Mumbai Police Threatened : मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हाट्सअपवर आलेल्या मेसेजमधून मुंबईत 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षा  यंत्रणा सतर्क झाली आहे.

Mumbai Police Threatened : मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हाट्सअपवर धमकीचा मेसेज आल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. धमकीचा मेसेज आला असला तरी कोणीही घाबरू नये सुरक्षा यंत्रणा सज्ज असल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी म्हटले आहे. याबरोबरच आम्ही सागर कवच हा प्रोग्रॅम  संपूर्ण समुद्रात सुरू केला आहे. सध्या सुरू असलेल्या सणांमुळे आम्ही दोन दिवस आधीच बंदोबस्त वाढवला आहे, अशी माहिती फणसळकर यांनी दिली आहे. 

मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हाट्सअपवर आलेल्या मेसेजमधून मुंबईत 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षा  यंत्रणा सतर्क झाली आहे. या मेसेजमुळे मुंबई पोलीस हाय अलर्टवर आहेत. आगामी हंगामासाठीही आम्ही सतर्क आहोत, सागरी सीमा सुरक्षित करण्यासाठी यंत्रणांना सतर्क केले आहे. आम्ही किनारपट्टीच्या सुरक्षेबाबत दक्ष आहोत आणि तटरक्षक दलाशी समन्वय साधत आहोत, अशी माहिती आयुक्त फणसळकर यांनी दिली आहे. 

दरम्यान, गुरूवारी रायगडमधील श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळ्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता या धमकीच्या मेसेजमुळे मुंबई पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. 

श्रीवर्धन येथे आढळलेल्या या बोटीमध्ये दोन  ते तीन एके-47 रायफल आढळल्या आहेत. त्याशिवाय 225 राउंड्स गोळ्याही त्या बोटीमध्ये मिळाल्या. त्याशिवाय हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

कसा असतो सागर कवच प्रोग्रॅम? 
समुद्र किणारी आणि संपूर्ण समुद्रात पेट्रोलिंग केली जाते. समुद्रात करण्यात येणाऱ्या पेट्रोलिंगसाठी नेव्ही आणि कोष्टगार्डची मदत घेतली जाते. त्यालाच समुद्र कवच म्हणतात. असाच समुद्र कवच प्रोग्राम आता राबवण्यात येणार आहे.  

सागरी सुरक्षेसाठी मुंबईत तीन पोलीस ठाणे कार्यरत

1) यलोगेट - कार्यकारी 


2) सागरी 1- अकार्यकारी


3) सागरी 2 - अकार्यकारी


सागरी एक आणि सागरी दोन हे फक्त सागरी भागात गस्त घालण्याचे काम करतात. तर यलोगेट पोलीस ठाण्याला गस्ती बरोबर गुन्हा दाखल करण्याचे अधिकार आहेत. दहिसर पासून वांद्रे पर्यंत सागरी दोन तर वांद्रे ते कुलाबा दरम्यान सागरी एक पोलीस गस्त घालतात.  गेट वे आँफ इंडिया ते वाशी खाडीपर्यंत यलोगेट पोलिसांची गस्त राहते. परंतू  दिव-दमण पासून गोवा पर्यंत समुद्रात 12 नाँटिकलच्या पुढे कुठलाही गुन्हा घडल्यास तो यलोगेट पोलीस ठाण्यात दाखल होतो. 

समुद्रात 12 नाँटिकलच्या आत कुठलाही गुन्हा घडल्यास त्यांची नजीकच्या पोलीस ठाण्यात नोंद होते. समुद्रात पाच नाँटिकलपर्यंत मुंबई पोलिसांची गस्त असते. 5 ते 12 नाँटिकल दरम्यान तटरक्षक दल तर 12 नाँटिकलच्या पुढे नौदलाची गस्त राहते.

महत्वाच्या बातम्या

Mumbai Police Threatened : मुंबईकरांनी घाबरुन जाऊ नये, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज; मुंबई पोलीस आयुक्तांचं आवाहन 

रायगड संशयित बोट प्रकरणात मुंबईत आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा, एके-47 सह बोटीवर 2 चॉपरही आढळले 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष रुग्ण, रुग्णालये आणि शासन यांना एकत्र आणणारे व्यासपीठ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष रुग्ण, रुग्णालये आणि शासन यांना एकत्र आणणारे व्यासपीठ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Mumbai Drug : सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; अश्विनी पॉलचे भांडे फुटले, रॅकेटही पोलिसांच्या टप्प्यात
सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; अश्विनी पॉलचे भांडे फुटले, रॅकेटही पोलिसांच्या टप्प्यात
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
नगरसेवकांचे मासिक मानधन 1 लाख रुपये करा, समाजवादी पक्षाच्या नगरसेविकेची महापौरांकडे मागणी
नगरसेवकांचे मासिक मानधन 1 लाख रुपये करा, समाजवादी पक्षाच्या नगरसेविकेची महापौरांकडे मागणी

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल
कोरेगावच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार महेश शिंदेंची साथ सोडली, राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Embed widget