एक्स्प्लोर
Karnal Cylinder Blast: फुगे भरण्याच्या सिलेंडरचा भीषण स्फोट, गाडीचा चक्काचूर, थरार CCTV मध्ये कैद!
हरियाणातील कर्नालच्या रामनगर (Ramnagar, Haryana) परिसरात फुग्यात हवा भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायट्रोजन सिलेंडरचा (Nitrogen Cylinder) भीषण स्फोट (Blast) झाला. हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या दुचाकी आणि कारचं यामध्ये नुकसान झालेलं आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. स्फोटामुळे परिसरातील घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि उभ्या असलेल्या गाड्यांचेही मोठे नुकसान झाले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही. स्फोटाच्या आवाजाने घाबरलेले रहिवासी घराबाहेर आले, तेव्हा त्यांना रस्त्यावर काचेचा खच पडलेला दिसला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















