मुंबई : सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी संदीप सिंहची चौकशी करताना भाजप अँगलनेही तपास करावा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे. संदीप सिंह याचा देवेंद्र फडणवीसांसोबतचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे. सुशांतसिंह प्रकरणात चित्रपट निर्माता संदीप सिंह वादात आहे. संदीप सिंह हा 'पंतप्रधान मोदी' यांच्यावरील चित्रपटाचा निर्माता आहे. या चित्रपट पोस्टर प्रकाशनावेळी संदीप सिंह हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह व्यासपीठावर दिसत आहे. त्यामुळं 'सुशांतप्रकरणी संदीप सिंहची चौकशी करताना भाजपचाही तपास करावा, ड्रग्जप्रकरणी चौकशी करताना भाजप अँगलनेही तपास करा', असं सचिन सावंत यांनी म्हटलंय.
दरम्यान, सचिन सावंत यांच्या आरोपांना केशव उपाध्ये यांनी उत्तर दिलं आहे. बाळासाहेब ठाकरेंचा बायोपिक संदीप सिंह बनवणार असल्याचा दिला दाखला उपाध्ये यांनी दिला आहे. सावंत यांच्या ट्वीटला री-ट्वीट करत उपाध्ये यांनी 'थोडा होमवर्क नीट करत जा. आता हे पहा आणि आता याच्याशी पण संबंध जोडणार का सचिन सावंतजी?' असं म्हटलं आहे.
रियाची चौकशी सुरु
सीबीआयकडून रियाला समन्स जारी करण्यात आलं आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आज चौकशी सुरु आहे. रिया चक्रवर्तीला सीबीआयनं आज चौकशीसाठी बोलावल. आज मुंबईत डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये तिची चौकशी सुरु आहे. रियासोबत तिचा भाऊ शौविक देखील आहे, अशी माहिती आहे. याआधी रियाची ईडीनं देखील चौकशी केली आहे.