मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय कसून तपास करत आहे. या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा तपास ईडीकडून सुरु आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सीबीआय तपासाचा आजचा सातवा दिवस आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुशांत सिहं मृत्यू प्रकरणी अनेक नवनवे खुलासे करण्यात येत आहेत. तसेच सुशांतच्या कुटुंबियांकडून सतत रिया चक्रवर्तीवर आरोप केले जात आहेत. अशातच सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीच माझ्या मुलाची खूनी आहे, असं खळबळजनक वक्तव्य केलं आहे.


सुशांतचे वडिल के. के. सिंह बोलताना म्हणाले की, 'रिया चक्रवर्ती माझ्या मुलाला अनेक दिवस विष देत होती. तिनेच सुशांतचा खून केला आहे. तपास यंत्रणांनी या गुन्हासाठी रियाला लवकरात लवकर अटक करावी.'





उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, सीबीआय सध्या गेल्या वर्षभरापासून सुशांतच्या मृत्यूच्या दिवसापर्यंतच्या घटनाक्रमांबाबत माहिती गोळा करत आहे. तसेच या हाय प्रोफाईल केसबाबत प्रत्येक दिवशी मीडियामध्ये अनेक नवनवे खुलासे होत असून यासंदर्भात अनेक आश्चर्यकारक दावे केले जात आहेत. अशीच एक घटना समोर आली असून सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचं आणि ड्रग्सचं कनेक्शन असल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाती मुख्य आरोपी रिया चक्रवर्ती व्यसन करण्यासाठी ड्रग्सचा वापर करत होती. रियाच्या वकीलांनी हा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला आहे.


अभिनेत्री कंगना राणौतचं वादग्रस्त वक्तव्य


अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तिच्या टीमकरवी ट्विटरवर तिने बॉलिवूडला गटार असं संबोधलं आहे. ती म्हणते, या प्रकरणात आता नार्कोटिक्स डिपार्टमेंट सहभागी झालं आहे. त्यामुळे यात बॉलिवूडचे बरेच ए लिस्टर कलाकार सापडतील. बॉलिवूड आणि अमली पदार्थ याचा एकमेकांशी घनिष्ट संबंध आहेच. पण सुशांतच्या प्रकरणानंतर हे संबंध आता उघड होऊ लागले आहेत. रियाने केलेले मेसेज, त्यातले अमली पदार्थाचे उल्लेख आता सगळ्या जगाला कळले आहेत. ईडीने आर्थिक फसवणुकीसाठी रियाचे जुने मेसेज काढले तर त्यात अमली पदार्थांबद्दल संभाषण आढळून आलं. त्यामुळे यात नार्कोटिक्स विभागही समाविष्ट केला गेला आहे. अभिनेत्री कंगना रणौतने याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. ती म्हणते, जर यात नार्कोटिक्स ब्युरो येत असेल तर बरेच अ दर्जाचे कलाकार तुरुंगाआड जाणार आहेत. जर अनेकांचे रक्ताचे नमुने घेतले तर बरेच धक्कादायक निकाल समोर येतील. पीएमओ यांनी जे स्वच्छ भारत अभियान चालवलं आहे, त्याअंतर्गत बॉलिवूड नामक गटारही यातून साफ होईल.


दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचं ड्रग्स कनेक्शन असल्याचा धक्कादायक दावा केला जात आहेत. अशातच मीडिया रिपोर्टमध्ये रियाच्या जुन्या व्हॉट्सअॅप चॅटच्या हवाल्याने रिया ड्रग्स घेत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या आरोपींवर रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या वक्तव्यात सतीश म्हणाला की, 'रियाने आपल्या जीवनात कधीही ड्रग्स घेतलेले नाहीत. त्यामुळे ती कोणत्याही क्षणी तिची ब्लड टेस्ट करण्यासाठी तयार आहे.'


महत्त्वाच्या बातम्या :