मुंबई : सीबीआयने सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, दीपेश सावंत आणि नीरज बऱ्याचदा चौकशी केली आहे. आता सीबीआय सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीची चौकशी करणार आहे. सीबीआयकडून काल रियाला चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलं आहे. रिया चक्रवर्तीची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे प्रश्न तयार आहेत. ABP न्यूजकडे रियाला विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची यादी आहे. हे प्रश्न रियाला सीबीआयकडून चौकशी दरम्यान विचारले जाण्याची शक्यता आहे.
सुशांतचा स्वयंपाकी नीरजने सीबीआयला दिलेल्या जबाबात काही प्रश्न रियापर्यंत आणून ठेवले आहेत. आता त्या प्रश्नांची उत्तरं रियाला विचारण्यात येणार आहेत. दीपेशने आपल्या जबाबात ज्या गोष्टींमध्ये रियाचं नाव घेतलं होतं. आता त्यासंदर्भात रिया प्रश्न विचारण्यात येणार आहेत. सिद्धार्थ पिठानीनेही रियाबाबत काही खुलासे केले आहेत. त्यासंदर्भात आता रियाला प्रश्न विचारण्यात येणार आहेत.
1. तुझ्यात आणि सुशांतमध्ये भांडण का झालं होतं?
2. सुशांतचं घर सोडल्यानंतर 7 दिवसांनी आणि 7 दिवस अगोदर काय झालं होतं?
3. तुम्ही सुशांतचं घर सोडून का गेलीस?
4. सुशांतसोबत भांडण कधी सुरु झालं?
सुशांत आणि रिया यांच्यात भांडण झालं त्या दिवशी म्हणजेच, 8 जूनच्या एका-एका मिनिटाला काय घडलं यासंदर्भात सीबीआय रियाला विचारणार आहे. रियाने दिलेली उत्तरं आणि सिद्धार्थ, दीपेश आणि नीरज यांच्या जाबाब यांच्यातील तथ्य तपासण्यात येतील. सुशांतचं घर सोडल्यानंतर रिया कुठे, केव्हा आणि कशासाठी गेली यासंदर्भातही माहिती सीबीआय घेणार आहे.
सुशांतच्या आर्थिक व्यवहारांबाबतही रियाकडे चौकशी
5. सुशांतच्या आर्थिक व्यवहारांचा कंट्रोल कोणाकडे होता?
6. सुशांतचे डेबिट-क्रेडिट कार्ड कोणाकडे होते?
7. घर खर्च आणि नोकरांच्या पगारांचा हिशोब कोण ठेवत होतं?
8. तुम्ही सुशांतच्या व्यावहारिक निर्णयांमध्ये दखल देत होता?
सुशांतची कमाई आणि घर खर्चाबाबत रिया जो काही जबाब नोंदवणार तो सीबीआय तथ्य आणि पुराव्यांशी जोडून पाहणार. सीबीआयकडे केवळ सुशांतचं बँक अकाउंट स्टेटमेंटच नाही तर कधी, कोणत्या अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन करण्यात आले याचीही माहिती आहे. रियाचं सुशांतसोबत भांडण, सुशांतची कमाई आणि सुशांतच्या घरातील नोकरांनंतर सीबीआय रिया आणि सुशांतच्या नात्याबाबतही प्रश्न विचारणार आहे.
9. सुशांतच्या कुटुंबियांशी तुमचं नातं कसं होतं?
10. सुशांतच्या बहिणीसोबत तुमचं भांडण का झालं होतं?
11. सुशांत आणि तुमच्या नात्यात केव्हा आणि का बदल झाला?
12. पैशांच्या देवाण-घेवाणीत तुमचं आणि सुशांतचं नातं कसं होतं?
सुशांतच्या आजारपणाचं सत्य सुशांतच्या मृत्यूच्या तपासातील सर्वात महत्त्वाची कडी आहे. रियाचा दावा आहे की, ती सुशांतवर उपचार करत होती. तसेच त्याची काळजी घेत होती. अशातच सीबीआय रियाला त्यासंदर्भात प्रश्न विचारणार आहे.
13. सुशांतला काय झालं होतं, त्याच्यावर कसले उपचार सुरु होते?
14. सुशांत डॉक्टरांकडे जात होता की, डॉक्टर घरी येत होते?
15. सुशांत कोणती औषधं खात होता? औषधांचे प्रिस्क्रिप्शन्स कुठे आहेत?
16. सुशांतचं मेडिकल रेकॉर्ड कोणाकडे होतं?
महत्त्वाच्या बातम्या :
- कसं होतं सुशांत-रियाचं नातं? सुशांतच्या मृत्यूआधी नेमकं काय घडलं?- नोकर नीरजचं संपूर्ण स्टेटमेंट
- CBI Investigation in SSR Death Case: आपलेच दात आणि आपलेच ओठ; संजय राऊतांचा राज्यातल्या भाजप नेत्यांवर निशाणा
- CBI Investigation in SSR Death Case: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुशांतच्या कुटुबियांची पहिली प्रतिक्रिया...
- SSR Case SC Verdict | सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे म्हणते...
- CBI Investigation in SSR Death Case | अन्यायाविरुद्धचा विजय, बिहार डीजीपींची प्रतिक्रिया, कुटुंबियांकडूनही निर्णयाचं स्वागत