मुंबई : सीबीआयकडून रियाला समन्स जारी करण्यात आलं आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आज चौकशी होणार आहे. रिया चक्रवर्तीला सीबीआयनं आज चौकशीसाठी बोलावलं आहे. आज मुंबईत डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये तिची चौकशी होईल. यासाठी रिया डीआरडीओ गेस्ट हाऊसकडे निघाल्याची माहिती आहे. रियासोबत तिचा भाऊ शौविक देखील आहे, अशी माहिती आहे. याआधी रियाची ईडीनं देखील चौकशी केली आहे.
दरम्यान सुशांतचा मॅनेजर सॅम्युल मिरांडा देखील डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. सीबीआयने सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, दीपेश सावंत आणि नीरज बऱ्याचदा चौकशी केली आहे. आता सीबीआय सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीची चौकशी करणार आहे. सीबीआयकडून काल रियाला चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलं आहे. रिया चक्रवर्तीची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे प्रश्न तयार आहेत. ABP न्यूजकडे रियाला विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची यादी आहे. हे प्रश्न रियाला सीबीआयकडून चौकशी दरम्यान विचारले जाण्याची शक्यता आहे.
सुशांतचा स्वयंपाकी नीरजने सीबीआयला दिलेल्या जबाबात काही प्रश्न रियापर्यंत आणून ठेवले आहेत. आता त्या प्रश्नांची उत्तरं रियाला विचारण्यात येणार आहेत. दीपेशने आपल्या जबाबात ज्या गोष्टींमध्ये रियाचं नाव घेतलं होतं. आता त्यासंदर्भात रिया प्रश्न विचारण्यात येणार आहेत. सिद्धार्थ पिठानीनेही रियाबाबत काही खुलासे केले आहेत. त्यासंदर्भात आता रियाला प्रश्न विचारण्यात येणार आहेत.
1. तुझ्यात आणि सुशांतमध्ये भांडण का झालं होतं?
2. सुशांतचं घर सोडल्यानंतर 7 दिवसांनी आणि 7 दिवस अगोदर काय झालं होतं?
3. तुम्ही सुशांतचं घर सोडून का गेलीस?
4. सुशांतसोबत भांडण कधी सुरु झालं?
सुशांत आणि रिया यांच्यात भांडण झालं त्या दिवशी म्हणजेच, 8 जूनच्या एका-एका मिनिटाला काय घडलं यासंदर्भात सीबीआय रियाला विचारणार आहे. रियाने दिलेली उत्तरं आणि सिद्धार्थ, दीपेश आणि नीरज यांच्या जाबाब यांच्यातील तथ्य तपासण्यात येतील. सुशांतचं घर सोडल्यानंतर रिया कुठे, केव्हा आणि कशासाठी गेली यासंदर्भातही माहिती सीबीआय घेणार आहे.
सुशांतच्या वडिलांचे आरोप, रियानंही सोडलं मौन
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणी दररोज नवनवे खुलासे केले जात आहेत. या प्रकणात अनेक लोकांवर संशयाची सुई रोखली जात आहे. अशातच या प्रकरणाला आता
एक आणखी नवं वळणं मिळालं आहे. आता या प्रकरणातील ड्रग अँगलही समोर आला आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात मुख्य दोषी मानलं जात आहे. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी रियावर आरोप लावलाय की, ' रियाने सुशांतचे पैसे फक्त स्वतःसाठीच खर्च केलेले नाहीत. तर तिने आपल्या कुटुंबियांनाही खर्चासाठी सुशांतचे पैसे ट्रान्सफर केले आहेत. तसेच रियानेचे माझ्या मुलाचा खून केलाय, असा आरोप सुशांतच्या वडिलांनी रियावर केला आहे. वारंवार होणाऱ्या आरोपांवर अखेर रियाने आपलं मौन सोडलं आहे. रियाने एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिच्यावर करण्यात येणाऱ्या सर्व आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच तिने अनेक नव्या गोष्टींचे खुलासेही केले आहेत.
संबंधित बातम्या
SSR Case | रिया... ड्रग्स... आणि अंडरवर्ल्ड; केंद्रीय नार्कोटिक्स ब्युरो टीम मुंबईत दाखल
सुशांतकडून 10 कोटी रुपये कसे मिळाले? ईडीने जया साहाला विचारले प्रश्न
'रियानेच माझ्या मुलाचा खून केलाय'; सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांचा आरोप
SSR Case | ड्रग डीलरच्या संपर्कात होती रिया चक्रवर्ती; जुन्या व्हॉट्सअॅप चॅटवरून ईडीचा खुलासा
SSR Suicide Case | संदीप सिंग तपास अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता?