मुंबई : सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस नवीन खुलासे होत आहेत. आता यात रिया चक्रवर्तीचं ड्रग्स आणि अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आलं आहे. नेमक काय आणि कसं आहे हे कनेक्शन याचा शोध आता तपास यंत्रणा लावत आहेत. रिया गेल्या काही वर्षांपासून ड्रग्स घेत होती हे तपासात समोर आलं आहे. गौरव आर्याकडून रिया ड्रग्स विकत घेत असे. गौरव आर्या बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा सप्लाय करण्यात सक्रिय आहे.


नार्कोटिक्स कंन्ट्रोल ब्युरो सध्या गौरव आर्याचा शोध घेत आहे. मात्र गौरव गोव्यामध्ये असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून गोव्यामध्ये त्याचं एक हॉटेल आहे आणि याच हॉटेलच्या आड गौरव आपला ड्रग्सचा कारभार करतो. बॉलिवूडमध्ये ड्रग्सच रॅकेट काही नवं नाही. अनेक कलाकारांची नावे वेळोवेळी ड्रग्स प्रकरणात समोर आली आहेत.


गौरव आर्या ड्रग्सच्या जगात एक मोठं नाव मानलं जातं. बॉलिवूडमधील सेलिब्रिटी यांना ड्रग्स सप्लाय करण्याचं काम गौरव आर्या करतो. रेव्ह पार्टीचं आयोजन सुद्धा वेळोवेळी गौरवकडून केलं जातं आणि अशाच एका पार्टीमध्ये गौरव आणि रियाची भेट झाल्याची माहिती आहे. रिया सुद्धा अशा रेव्ह पार्टीमध्ये जात होती. गौरव आर्याचे आता अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर येत आहेत.


'रियानेच माझ्या मुलाचा खून केलाय'; सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांचा आरोप


गौरव आर्याचं नाव अबू अस्लम आजमी सोबत जोडलं जात असून दोघे चांगले मित्र आहेत. अबू अस्लम आजमी एका मोठ्या नेत्याचा भावाचा मुलगा आहे. अबू अस्लम आजमीला 2018 मध्ये दिल्लीच्या नार्कोटिक्स सेलने मुंबईमधून अटक केली होती. या केसमध्ये बड्या लोकांची नावं त्यावेळेस समोर आली होती. इतकंच नाही तर हे अंडरवर्ल्ड ड्रग्स रॅकेटचा भाग असल्याचं त्यावेळेस समोर आलं होतं. अबू अस्लम आजमीचं कनेक्शन दुबई, यूएई, युके आणि वेस्ट आशियाशी जुळलेले आहेत. 2018 मध्ये 40 कोटींचे ड्रग्स या रॅकेटकडून नार्कोटिक्स सेलने जप्त केले होते आणि गौरव आर्या पण याच रॅकेटचा भाग होता.


अबू अस्लम आजमी गोव्यात एक हॉटेल उगडणार होता, ज्यात तो गौरवला पार्टनर म्हणून घेणार होता.अबू अस्लम आजमीचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन आहेत आणि गौरव अबू अस्लम आजमीचा मित्र आहे आणि त्यामुळे आता अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आलं असून रियाचं गौरवला भेटणं आणि त्याचशी असलेली ओळख यामुळे रियाचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत का याचाच तपास आता सीबीआई आणि नार्कोटिक्स सेल करणार आहे.


सुशांत प्रकरणामध्ये ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर कंगना रणौतनेही ट्वीट करून आपल्याकडे यासंदर्भात अधिक माहिती असल्याचं सांगितल असून तपासामध्ये सहकार्य करणार असल्याचं देखील म्हटलं आहे. मात्र यामुळे आपल्या जीवाला धोका असून आपल्याला पोलीस सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी देखील कंगना राणावतकडून करण्यात आली आहे.


SSR Case | रिया-संदीप फिरतायत नावाजलेल्या गीतकाराच्या गाडीतून?


एकंदरीत हा तपास आता तीन सेंट्रल एजन्सीकडून केला जात आहे. ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग, सीबीआईकडून सुशांतच्या आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासंदर्भात आणि आता सेंट्रल नार्कोटिक्स कडून ड्रग्स संदर्भात. त्यामुळे येणाऱ्या काळात अजून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या बातम्या :