मुंबई : सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला आता खूपच वेगळ वळण मिळू लागलं आहे. नेपोटिझम, डिप्रेशन, काळी जादू आणि नंतर आर्थिक फसवणूक असे टप्पे पार करत आता हा प्रवास अमली पदार्थ सेवनापर्यंत येऊन पोहोचला आहे. असं असताना काही गोष्टी नव्याने समोर येऊ लागल्या आहेत. रियाचे सुशांतसोबतचे संबंध जवळचे होतेच. पण आत संदीप सिंगच्या वावराबद्दलही शंका व्यक्त केली जाते आहे.


सुशांतच्या मृत्यूनंतर संदीप सिंगचे कॉल रेकॉर्ड हाती लागले आहेत यात सर्वाना धक्का देणारी गोष्ट समोर आली आहे, ती अशी की सुशांतच्या मृत्यूनंतर संदीप तपास अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. इतकंच नव्हे, तर बांद्रा पोलिस स्थानकाचे सब इन्स्पेक्टरच्याही संपर्कात तो होता. संदीपच्या या फोन कॉल्समुळे नवा पेच तयार झाला आहे.


सुशांतचा 14 जूनला मृत्यू झाल्यानंतर संदीप सतत पुढे होता. सुशांतचं आधार कार्ड, पॅनकार्डही त्याच्याकडे होतं. संदीप सुशांतचा मित्र असला तरी तो गेल्या एक वर्षापासून त्याच्या संपर्कात नव्हता. पण सुशांतच्या मृत्यूनंतर अचानक तो या सुशांतच्या शेवटच्या सोपस्कारात आघाडीवर होता. कूपर रुग्णालयातही रियाला त्यानेच प्रवेश मिळवून दिला होता. तो रुग्णवाहिकेच्या चालकासोबत सतत बोलत होताच. पण आता तपास अधिकाऱ्यांशीसुद्धा बोलत असल्याचं या कॉल डिटेल्समधून समोर आलं आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या हवाल्यानुसार भूषण आणि वैभव या दोन अधिकाऱ्यांच्या संपर्कात संदीप होता. सुशांतच्या मृत्यूनंतर संदीप तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत का बोलत होता, हे प्रश्नचिन्ह कायम आहे.


संबंधित बातम्या :



SSR Suicide Case | सुशांत सिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी निर्माता संदीप सिंह विरोधात तक्रार दाखल


SSR Case Update | सुशांतचा मित्र संदीप सिंहने पार्थिव नेणाऱ्या रुग्णवाहिका चालकाला 4 फोन का केले?