जया साहा ही सुशांतची टॅलेंट मॅनेजर होती. सुशांत जाण्याआधी एक वर्षापासून ती सुशांतसाठी टॅलेंट मॅनेजर म्हणून काम पाहात होती. याच जया साहाने गेल्या वर्षभरात सुशांतकडून 10 कोटी रुपये कमावले असल्याचं समोर आलं आहे. ईडीनेही जया साहाला या 10 कोटीच्या रकमेबद्दल विचारणा केली आहे. तर सुशांतने ज्या जाहिराती केल्या त्याचं कमिशन म्हणून आपल्याला ही रक्कम मिळाल्याचं जया साहा म्हणतेय.
सुशांतची टॅलेंट मॅनेजर म्हणून आधी दिशा सॅलियन काम पाहात होती. कालंतराने ते काम सुटलं आणि त्याचं काम जया साहा करू लागली. जया सहाच्या अकाऊंटवर थेट 10 कोटी रुपये असल्याचं ईडीच्या लक्षात आलं आहे. ईडीनेही हा खुलासा केला आहे. आता त्यापुढची बातमी अशी की हे 10 कोटी कुठू आले असं विचारल्यावर जया साहाने हे पैसे सुशांतने केलेल्या जाहिरातीतून मिळाल्याचं जयाने सांगितलं आहे. पण सुशांत नेमक्या किती जाहिराती करत होता तेही पाहाणं इथे महत्वाचं आहे. सुशांतने आपल्या कारकिर्दीत एकूण 2 टीव्ही मालिका आणि 11 चित्रपट केले. पैकी गेल्या वर्षात त्याने सोनचिडिया, ड्राईव्ह आणि दिल बेचारा हे चित्रपट केले. पैकी ड्राईव्ह आणि दिल बेचारा हे चित्रपट ओटीटीवर आले आहेत. मग केवळ एका वर्षात जयाकडे 10 कोटी कसे आले हा प्रश्न निर्माण होतो.
SSR Case | रिया-संदीप फिरतायत नावाजलेल्या गीतकाराच्या गाडीतून?
एका जाहिरात मिळवून दिली की साधारण 2 टक्के कमिशन घेतलं जातं. हे कमिशन टॅलेंट मॅनेजर्सना मिळतं. सुशांतने केलेल्या जाहिरातीमधून 10 कोटी रुपये आल्याचं जया सांगत असेल तर सुशांतने नेमक्या किती जाहिराती केल्या होत्या हे आता पाहिलं जात आहे. दोन टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे, 10 टक्के कमिशन घेतलं गेलं असं गृहित धरलं तरी सुशांतने 100 कोटींच्या जाहिराती करायला हव्यात. मग हे कमिशन नक्की कुठलं होतं याची चौकशी ईडी करत आहे. खरंतर या रकमेचा आणि अमली पदार्थाच्या सेवनाचा काही संबंध आहे का हेही तपासलं जात आहे. कारण, सुशांत बाहेर हॉटेलवर गेला असतानाही त्याला चार थेब कशातून कसे द्यायचे हेही जयाने रियाला सांगितलं असल्याचे दाखले मिळू लागले आहेत.
एक छोटी टॅलेंट मॅनेजर सुशांतला लुटत होती का, यावर आता प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे. सुशांतची एकूण मिळकत 50 ते 60 कोटी रुपये होतं. असं असतानाही इतकी मोठी रक्कम सुशांतकडून जाहिरातीचं कमिशन म्हणून कशी मिळेल हेही तपासलं जातं आहे. सत्य लवकरच बाहेर येईल.
Sushant Singh Case | सुशांत आत्महत्या प्रकरणी CBIकडून एकाच वेळी सहा जणांची चौकशी सुरु