एक्स्प्लोर
Advertisement
जवानांना मिळणारे पिवळे पाणी ही पारदर्शकताच : सामना
मुंबई : महापालिका निवडणुका तोंडावर असताना शिवसेना-भाजपमध्ये युतीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. युतीसाठी पारदर्शकतेचा अजेंडा मांडणाऱ्या भाजपवर 'सामना'च्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. 'कारभारात पारदर्शकता हवी असे आता राज्यकर्त्यांतर्फे ऊठसूट सांगितले जाते, पण पारदर्शक कारभार कसा याचे प्रात्यक्षिक त्या वेडय़ा ठरवण्यात आलेल्या जवानाने दाखवले' या शब्दात सामनाने टीका केली आहे.
'जळून खाक झालेली व जळून भोके पडलेली रोटी त्या जवानास खावी लागते. ही पारदर्शकताच आहे. डाळीचा पत्ता नसलेले पिवळे पाणी व त्यातून दिसणारा वाटीचा तळ हे तर पारदर्शक व ‘स्वच्छ’ कारभाराचेच लक्षण मानावे लागेल. राज्यकर्ते वेडय़ासारखे निर्णय घेतात. ते बरोबर ठरवणारे जवानांच्या आक्रोशाला वेडे ठरवतात. एकंदरीत काय तर सगळाच वेडय़ांचा बाजार!' अशी खिल्ली शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'तून उडवण्यात आली आहे.
'सीमांचे रक्षण करणाऱ्या इतर सुरक्षा दलांमधील जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न खावे लागत असल्याचे सत्य बाहेर आल्याने सरकारच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. तेजबहादूर यादव या जवानाने एक व्हिडीओ व्हायरल करुन कोणत्या दर्जाचे कच्चे, निकृष्ट अन्न जवानांना पुरवले जाते याचा पर्दाफाश केला. यावर हा जवान ठार वेडा किंवा मानसिक रुग्ण असल्याचे सरकारने सांगितले, पण त्या जवानास वेडा ठरवून प्रश्न निकाली लागणार आहे काय?' असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
आरोग्य
क्रीडा
Advertisement