एक्स्प्लोर
Advertisement
नवी मुंबई पोलीस सत्ताधारी शिवसेनेचे हुजरे, पोलीस आयुक्तांच्या विरोधात आंदोलन करणार, धनंजय मुंडेंचा इशारा
आमदारांच्या गाडीवर हत्याराने हल्ला होवूनही जर पोलीस आयुक्त आरोपींना पाठीशी घालत असतील तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी आंदोलन करणार असल्याचा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये उद्घाटन सोहळ्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये जोरदार राडा झाला होता. या राड्यात राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक गाडीतून जात असताना त्यांच्या गाडीवर लोखंडी रॉड, कैचीने हल्ला केला होता. या प्रकरणी दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात आल्याने विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार संदीप नाईक यांनी पोलीस आयुक्त संजय कुमार यांची भेट घेत शिवसेना नगरसेवकांना अटक करण्याची मागणी केली.
नवी मुंबईत शिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्ते भिडले, आमदार संदीप नाईकांची 'रेंज रोव्हर' फोडली
पोलिसांनी सत्ताधारी शिवसेनेच्या दबावाखाली येत शहरातील वातावरण खराब करणाऱ्यांना पाठिंबा दिला असून पोलीस त्यांचे हुजरे झाल्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.
हा हल्ला शिवसेना नगरसेवक करण मढवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांकरवी केला असल्याचा गंभीर आरोप संदीप नाईक यांनी केला आहे. काल रबाले पोलीस ठाण्यात शिवसेना नगरसेवक एम के मढवी, नगरसेवक करण मढवी, नगरसेविका विनया मढवी, इतर तीन जणांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र हे गुन्हे मागे घेण्यात आल्याने विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार संदीप नाईक यांनी पोलीस आयुक्त संजय कुमार यांची भेट घेत शिवसेना नगरसेवकांना अटक करण्याची मागणी केली.
आमदारांच्या गाडीवर हत्याराने हल्ला होवूनही जर पोलीस आयुक्त आरोपींना पाठीशी घालत असतील तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी आंदोलन करणार असल्याचा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला आहे.
नवी मुंबईत शिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्ते भिडले, आमदार संदीप नाईकांची 'रेंज रोव्हर' फोडली
नवी मुंबईत एका कार्यक्रमात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. या राड्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप नाईक यांच्या रेंज रोव्हर कारची तोडफोड केली होती. ऐरोलीत महापालिकेचं सभागृह बांधण्यात आलं आहे. त्या सभागृहाच्या उद्घाटनचा कार्यक्रम होता. या उद्घाटनाचं श्रेय घेण्यावरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले. दोन्ही गटामध्ये तुफान हाणामारी झाली. त्यात संदीप नाईक यांच्या गाडीची तोडफोडही करण्यात आली होती.
दरम्यान, या हाणामारीमुळे शहरात तणावाचा वातावरण झालं होतं. संदीप नाईक यांच्यावर शिवसेनेने केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून नवी मुंबईतील ऐरोली, कोपरखैरणे, दिघा, घणसोली बंद करण्याचा प्रयत्न केला होता. माजी मंत्री गणेश नाईक नाईक यांचे पुत्र, संदीप नाईक हे ऐरोलीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement