एक्स्प्लोर
मुंबई सेंट्रल स्टेशनवरच RPF जवानाची गोळी झाडून आत्महत्या
मुंबई : मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवरच आरपीएफ जवानाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्वतःच्याच सर्व्हिस रायफलमधून गोळी झाडून 23 वर्षीय दलवीर सिंहने आत्महत्या केली.
दलवीरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याचा मृत्यू झाला होता. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे त्याचं लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं होतं.
मूळ हरियाणाचा असलेला दलवीर 2015 पासून मुंबईत सेवेत रुजू झाला. शनिवारी त्याच्यासह पाच जवानांची ड्युटी गुजरात मेलमध्ये होती. मात्र त्यापूर्वी मुंबई सेंट्रल स्थानकावरील कार्यालयातच त्याने गोळी झाडून आत्महत्या केली.
दलवीरच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आरपीएफ आणि जीआरपी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement