एक्स्प्लोर

मुंबईकरांसाठी गूड न्यूज, आता दीड तासांचा प्रवास होणार फक्त 36 मिनीटांत 

रोपवेने एक किलोमीटरचे अंतर दोन मिनीटांत कापता येणार आहे. एमएमआरडीएने पूर्व उपनगरे पश्चिम मार्गाला जोडण्यासाठी रोपवे प्रकल्पाचा रोडमॅप तयार केला आहे.

मुंबई : मुंबईत(mumbai ) रस्ते आणि जलमार्गावर होणारी रहदारी कमी करण्यासाठी आता हवेतून मार्ग बनविण्याच्या कामाने वेग घेतला आहे. मुंबईत 7.2 किलोमीटर लांबीचा रोपवे(Ropeway) बनविण्याची योजना सरकारने तयार केली आहे.  

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2023 पासून पहिल्या रोपवेचे बांधकाम सुरू करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. हे बांधकाम 2025 पर्यंत सुरू करण्याचे लक्ष्य आहे. पुढील वर्षाच्या अखेरीपर्यंत या प्रकल्पाचे काम सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवून, एमएमआरडीएने सवलतीधारकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे.

एमएमआरडीएच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सवलतधारकाचे काम रोपवेच्या मार्गात येणाऱ्या जमिनीच्या मालकांना प्रकल्प आणि नुकसान भरपाईच्या रक्कमेची माहिती सांगणे असेल. यासोबतच रोपवेच्या उभारणीमुळे आसपासच्या परिसरावर त्याचा काय परिणाम होणार आहे याचीही माहिती द्यावी लागणार आहे. जमीन मालक आणि एमएमआरडीए यांच्या मध्ये होणारा व्यवहार  आणि इतर प्रक्रिया पारदर्शक करणे हे सवलतधारकाचे मुख्य कार्य असणार आहे.

568 कोटी रुपये होणार  खर्च  

महावीर मेट्रो स्टेशन ते पॅगोडा-गोराई असा 7.2 किमी लांबीचा रोपवे बांधण्यासाठी 568 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. लोकांना लास्ट माईल कनेक्टिव्हिटी देण्यासाठी हे रोपवे जोडण्यात येणार आहेत. महावीर नगरहून गोराईला जाण्यासाठी दीड तास लागतो, तर रोपवेने हा प्रवास अवघ्या 36 मिनिटांत पूर्ण होणार आहे. रोपवे प्रकल्पातील डिझाइन, फायनान्स बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्सफर (DFBOT) च्या धर्तीवर प्राधिकरणाच्या हालचाली वेगात होत आहेत. प्रकल्पाच्या निविदेनुसार, इच्छुक कंपनीला रोपवे बांधणे, वित्तपुरवठा करणे आणि चालवणे ही कामे स्वतः करावी लागणार आहेत. त्यासठी विशिष्ट रक्कम एमएमआरडीएला भरावी लागणार आहे. एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जी कंपनी प्राधिकरणाला चांगला प्रस्ताव देऊन अधिक रक्कम देईल, त्यांनाच या प्रकल्पाची संधी दिली जाईल.

2 मिनिटात कापणार 1 किमी अंतर
रोपवेने एक किलोमीटरचे अंतर दोन मिनिटांत कापता येणार आहे. एमएमआरडीएने पूर्व उपनगरे पश्चिम मार्गाला जोडण्यासाठी रोपवे प्रकल्पाचा रोडमॅप तयार केला आहे. याद्वारे लोकांना मालाड मेट्रो स्टेशन, मार्वे, बोरिवली रेल्वे स्टेशन, मेट्रो 2-ए आणि गोराई जेट्टीपर्यंत सहज पोहोचता येणार आहे. मुंबईतील वाढत्या वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.

या स्थानकांना होणार फायदा 
महावीर नगर मेट्रो स्टेशन
सीताराम मंदिर चौक 
चारकोप मार्केट
चारकोप आय चौक
टर्जन पॉइंट
पॅगोडा
गोराई मिडल स्टेशन
गोराई गाव

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

इतर महत्वाच्या बातम्या 

President Raigad Visit : राष्ट्रपती हेलिकॉप्टरऐवजी आता रोपवे ने रायगडवर जाणार... शिवभक्तांच्या रोषानंतर निर्णयात बदल

Mumbai Omicron : मुंबईवर ओमायक्रॉनचं सावट? आफ्रिकेतून धारावीत आलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला राज्यात 42 केंद्रावर कॉपी; 12 वी परीक्षेत मराठवाड्यातच सर्वाधिक कॉपीची नोंद
पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला राज्यात 42 केंद्रावर कॉपी; 12 वी परीक्षेत मराठवाड्यातच सर्वाधिक कॉपीची नोंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 11 February 2025ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 11 February 2025Rushiraj Sawant : मुरलीअण्णांचा आदेश, विमानाचा यू टर्न; सावंतांच्या लेकाच्या परतीची INSIDE STORYPune Athawale Group Protest : पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता भीम अनुयायी आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला राज्यात 42 केंद्रावर कॉपी; 12 वी परीक्षेत मराठवाड्यातच सर्वाधिक कॉपीची नोंद
पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला राज्यात 42 केंद्रावर कॉपी; 12 वी परीक्षेत मराठवाड्यातच सर्वाधिक कॉपीची नोंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
BMC Mumbai: मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
Mumbai News : बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
Embed widget