एक्स्प्लोर
Advertisement
मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेल्या रॉबर्ट वाड्रांसमोर उपस्थितांकडून मोदींच्या नावाने घोषणा
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी आज मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवीचे दर्शन घेतले. परंतु वाड्रा दर्शनानंतर परतत असताना मंदिराच्या आवारातील काही लोकांनी त्यांच्यासमोर मोदी-मोदी अशा घोषणा दिल्या.
मुंबई : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी आज मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवीचे दर्शन घेतले. परंतु वाड्रा दर्शनानंतर परतत असताना मंदिराच्या आवारातील काही लोकांनी त्यांच्यासमोर मोदी-मोदी अशा घोषणा दिल्या. यावेळी माध्यमांनी रॉबर्ट वाड्रा यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी राजकीय विषयावर बोलण्यास नकार दिला.
वाड्रा दर्शन घेऊन परतत असताना ज्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने घोषणा दिल्या, त्या लोकांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, आम्हाला पुन्हा एकदा मोदी सरकार हवे आहे, म्हणून आम्ही घोषणा दिल्या.
त्यानंतर माध्यमांनी घोषणा देणाऱ्या लोकांना तुम्ही भाजप कार्यकर्ते आहात का? असे विचारल्यावर ते म्हणाले की आम्ही भाजपचे लोक आहोत. परंतु आम्ही स्वतःहून घोषणा दिल्या आहेत. आम्हाला कोणीही घोषणा देण्यास सांगितले नव्हते.
व्हिडीओ पाहा
यावेळी माध्यमांनी रॉबर्ट वाड्रा यांच्याशीदेखील संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींबद्दल केलेल्या विधानावरुन देशभरातलं वातावरण तापलेलं आहे. याबाबत वाड्रा यांनादेखील माध्यमांनी विचारणा केली. परंतु यावर वाड्रा म्हणाले की, मी मंदिरात देवदर्शनासाठी आलो आहे, चांगलं दर्शनदेखील झालं आहे. त्यामुळे यावेळी मी राजकारणावर काहीही बोलणार नाही.
निवडणूक लढवण्यासंदर्भात योग्यवेळी निर्णय घेणार : रॉबर्ट वाड्रा | नवी दिल्ली | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
बॉलीवूड
Advertisement