एक्स्प्लोर

BJP Campaign: भाजपच्या ऑनलाईन सदस्य नोंदणीवर सायबर भामट्यांचा दरोडा, नागरिकांची फसवणूक; पदाधिकाऱ्यांची तातडीने पोलिसांत धाव

BJP Campaign: भाजपच्या शिवडीतील एका पदाधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार दक्षिण सायबर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला असून दिल्लीतून पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

मुंबई: राज्यभरात 25 लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट साधणाऱ्या भाजपकडून मुंबईसह राज्यभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सदस्य नोंदणी अभियान राबवले जात आहे. पक्षातील प्रत्येक पदाधिकारी यांना सदस्य नोंदणीबाबत विशेष जबाबदारी दिली असून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे. मात्र, याचाच फायदा सायबर चोरट्यांनी घेऊन आता भाजपच्या सदस्य नोंदणीच्या नावाखाली अंदाजे शेकडो नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भाजपच्या शिवडीतील एका पदाधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार दक्षिण सायबर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला असून दिल्लीतून पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

दिल्लीतून पोलिसांनी एकाला अटक केली

सरबजीत सिंग असे या अटक आरोपीेचे नाव असून त्याच्याकडून दोन मोबाईलही पोलिसांनी जप्त केले आहेत. शिवडीतील तक्रारदार भाजपच्या पदाधिकाऱ्याला 12 फेब्रुवारीच्या रात्री मोबाईलवरील सोशल मिडियावर एक व्हायरल मेसेज आला. यात भाजपच्या सदस्य नोंदणी अभियाना दरम्यान खासदार, आमदार, नगरसेवक अध्यक्ष किंवा अन्य पक्षातील पदाधिकारी यांना कमी किंमतीत रेफरल कोडद्वारे मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करून हवी असल्यास संपर्क करण्याबाबत सांगण्यात आले होते. त्यानुसार शिवडीतील पदाधिकाऱ्याने दिलेल्या मोबाईल नंबर हा व्हाॅट्स अॅप वर त्याची माहिती घेतली असता पक्षाचे नाव चिन्हासह 'सदस्यता मोहिम सर्वेक्षण ऑनलाईन सेवा' असे दाखवण्यात आले.

पक्षातील पदाधिकारी नागरिक यांची फसवणूक

त्याचबरोबर पुढे विश्वास पटावा यासाठी bjpsadasyata@gmail.com या ईमेल आयडीचा वापर केल्याचेही निदर्शनास आले आहे. मात्र, यामुळे पक्षातील पदाधिकारी नागरिक यांची फसवणूक केली जात असून, पक्षाची बदनामी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर शिवडीतील त्या पदाधिकाऱ्याने सायबर पोलिसात तक्रार नोंदवली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या दक्षिण सायबर पोलिसांनी बीएनएसच्या कलम 318(4) (फसवणूक) आणि 319(2) (तोतयागिरी करून फसवणूक) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66(ड) आणि 74 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

दिल्ली अन् छत्तीसगडमध्ये निघालं कनेक्शन

या प्रकरणी सायबर पोलिसांनी दिल्लीतून 24 वर्षीय तरूणाला 14 फेब्रुवारी रोजी अटक केली आहे. समरजीत सिंग असे या 24 वर्षीय तरुणाचे नाव असून त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने अशा प्रकारे 400 ते 500 पदाधिकाऱ्यांची अशा प्रकारे फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. समरजीत याचे दोन मोबाईल पोलिसांनी चौकशी अंती जप्त केल्याची माहिती मिळत असून चौकशीत बिहारमधील एका 17 वर्षीय तरुणाचा सहभागही निश्चित झाला आहे. फसवणूकीसाठी जी 5 बॅक खाती वापरण्यात आली. ती या 17 वर्षीय तरुणाने पुरवल्याचा संशय पोलिसांना आहे. या मुलाची चौकशीही पोलिस करत आहेत. या दोघांच्या चौकशीतून फसवणूकीतील मास्टर माईंड हा छत्तीसगडमधील व्यक्ती असल्याचे समोर येत असून सायबर पोलिस त्याचाही शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या टोळीने अशा प्रकारे किती जणांकडून पैसे उकळले आहेत. किती आरोपींचा यात सहभाग आहे त्याचा पोलिस शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil:  नदी समुद्राला मिळाली की अस्तित्व संपतं, तुम्ही ज्या समृद्रात जाताय, त्यातून...; जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं
Jayant Patil:  नदी समुद्राला मिळाली की अस्तित्व संपतं, तुम्ही ज्या समृद्रात जाताय, त्यातून...; जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
Embed widget