मुंबईतील रिझवी कॉलेजचे चार विद्यार्थी बुडाले, खालापूरच्या धरणातील सहलीवेळी घडली दुर्घटना
Four Drowned on Rainy Trip : मुंबईतील रिझवी कॉलेजच्या पावसाळी सहलीला गेलेल्या चार जण बुडाले, च्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला
रायगड : मुंबईतील रिझवी कॉलेजचे (Rizvi College) चार विद्यार्थी बुडाल्याची घटना घडली आहे. पावसाळी सहलीसाठी खालापूर येथील धरणात गेलेले चार जण बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पावसाळी सहल गेली होती, यावेळी ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. धरणात बुडालेले विद्यार्थी मुंबईच्या बांद्रा येथील रिझवी कॉलेजचे असल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे 37 तरुण-तरुणी या सहलीसाठी गेले होते, त्यापैकी चार जण बुडले. रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील धरणात कॉलेजचे चार विद्यार्थी बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. खालापूर येथील सत्य साई बाबा धरणात चार युवक बुडाल्याची ही दुर्घटना घडली आहे.
पावसाळी सहलीला गेलेले चार जण बुडाले
रायगडच्या खालापूर तालुक्यातील वावर्ले ग्रामपंचायत मधील पोखरवाडी जवळील सत्य साई बाबा धरणात चार युवक बुडाले. पावसाळी सहलीसाठी रिझवी कॉलेजमधील एकूण 37 युवक-युवती खालापूर येथे आले होते. सहलीवेळी पाण्याचा अंदाज न आल्याने धरणात चार जण बुडाले, यावेळी बचावकार्य राबवण्यात आलं. मात्र, त्या चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
धरणात बुडून चार जणांचा मृत्यू
घटनास्थळी खालापूर पोलीस दाखल झाले असून त्यांनी चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. या दुर्घटनेत ईशांत यादव, आकाश माने, रनक बंदा, एकलव्य सिंग या चार विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.