Sushant Singh Rajput Case : तब्बल दीड वर्षांनंतर रिया चक्रवर्तीला स्वतःची बँक खाती वापरता येणार
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशी दरम्यान रीयाची बँक खाती न्यायालयानं गोठवली होती.
मुंबई : सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput Case) मृत्यू प्रकरणानंतर संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रिया चक्रवर्तीला तब्बल दीड वर्षांनंतर स्वतःची बँक खाती वापरता येणार आहेत. रियाने आपले बँक खाते डीफ्रीज करण्याची याचिका विशेष कोर्टाने स्विकारली आहे. रियाने आपले बँक खाते डीफ्रीज करण्याची मागणी केली होती. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशी दरम्यान रीयाची बँक खाती न्यायालयानं गोठवली होती.
Mumbai: Spl NDPs court allows actor Rhea Chakraborty's application to defreeze her bank account & release her gadgets seized last yr. The court ordered to return her laptop, mobile phone & other gadgets seized during investigation into late actor Sushant Singh Rajput death case. pic.twitter.com/lCvJWWQbrI
— ANI (@ANI) November 10, 2021
कोर्टाने सांगितले की, रियाचे अकाऊंट आणि फिक्सड डिपॉजिट डी- फ्रीज करण्याच्या याचिकेवर NCB चा आक्षेप नाही. कारण रियाकडून लेखी अंडरटेकिंग घेण्यात आले आहे. रीया गरज पडल्यास अकाउंट बॅलेन्स उपलब्ध करेल त्यानंतर अटी- शर्तींसह ही परवानगी देण्यात आली आहे. आर्थिक स्थिती चांगली नसल्यानं बँक खात्यांचा ताबा मिळण्यासाठी रियाने कोर्टात याचिका केली होती. बँक खात्यांसोबत फोन, मोबाईल वापराचीही परवानगी एनडीपीएस कोर्टाने दिली आहे.
वर्षभरापूर्वी केलेली आत्महत्या....
सुशांत सिंह राजपूत यानं वर्षभरापूर्वी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या निधनानंतर अनेक चर्चांना उधाण आलं. मुंबई पोलिसांशिवाय या आत्महत्येच्या तपासासाठी बिहार पोलीस, सीबीआयही पुढं आली. यानंतर सदर प्रकरणी अनेक धागेदोरे मिळत गेल्यामुळं ईडी आणि एनसीबी या यंत्रणांनीही त्यांच्या परिनं याचा तपास सुरु केला होता. ज्यामध्ये सुशांतची कथित प्रेयसी, अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचीही चौकशी करण्यात आली होती. सुशांतच्या कुटुंबीयांकडून रियावर काही गंभीर आरोप करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. वर्षभरानंतरही या प्रकणारची चर्चा सुरुच आहे.