एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आता मुंबई विद्यापीठाचं नाव बदलण्याची मागणी!
विद्यापीठ नामांतराची वाद आणि चर्चा आता मुंबईत येऊन पोहोचली आहे. कारण मुंबई विद्यापीठाचं
मुंबई: विद्यापीठ नामांतराची वाद आणि चर्चा आता मुंबईत येऊन पोहोचली आहे. कारण मुंबई विद्यापीठाचं नाव राजमाता जिजाऊ भोसले मुंबई विद्यापीठ करा, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिवसेना नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी त्याबाबतचा प्रस्ताव मुंबई महापालिकेत सादर केला.
या प्रस्तावाला सर्वपक्षीय सहमती मिळेल, असा विश्वास दत्ता नरवणकर यांनी व्यक्त केला आहे.
सध्या सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद चर्चेत आहे. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र हा वाद हायकोर्टात गेल्यानंतर नामांतर लांबणीवर पडलं आहे.
सोलापूर विद्यापीठाच्या नामकरणाला शिवा-अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेसह अन्य काहींनी जनहित याचिकेद्वारे आव्हान दिलं होतं. त्यावर कोणताही निर्णय झालेला नसताना राज्य सरकार असा निर्णय घेऊ शकत नाही, असा दावा या याचिकेतून करण्यात आला.
विद्यापीठ आणि बदललेली नावे
मराठवाडा विद्यापीठ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
पुणे विद्यापीठ – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
नागपूर विद्यापीठ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
अमरावती विद्यापीठ- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ
नाव बदलण्याची आणि पर्यायी नावे देण्याची मागणी
सोलापूर विद्यापीठ - 1) अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर
2) शिवयोगी सिद्धेश्वर विद्यापीठ सोलापूर
शिवाजी विद्यापीठ कोल्हपूर - छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ
संबंधित बातम्या
सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराला हायकोर्टाची स्थगिती
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचं नामांतर करा : आमदार क्षीरसागर
देशातील 62 विद्यापीठांना स्वायत्त दर्जा
आता पुणे विद्यापीठाचं नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ !
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement