एक्स्प्लोर

मुंबईकरांसाठी दिलासा, आजपासून 244 ठिकाणी कोरोनाची मोफत चाचणी

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महापालिकेकडून आजपासून 244 ठिकाणी कोरोनाची मोफत चाचणी केली जाणार आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या मुंबईत आता कोरोना चाचणी मोफत होणार आहे. मुंबई महापालिकेकडून आजपासून 244 ठिकाणी मोफत कोरोना चाचणीची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे असल्यास नागरिक महापालिकेच्या हेल्पलाईनवर किंवा 1916 या क्रमांकावर संपर्क साधून जवळच्या केंद्राची माहिती घेऊन तिथे मोफत कोरोनाची चाचणी करु शकतात.

मुंबईत आतापर्यंत केवळ 54 ठिकाणी कोरोनाची चाचणी केली जात होती. मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येणारे येणारे विविध दवाखाने, रुग्णालयांसह एकूण 244 ठिकाणी आजपासून मोफत वैद्यकीय चाचणी होणार आहे. त्यामुळे मोफत कोरोना चाचणीच्या ठिकाणींची संख्या वाढून जवळपास 300 होणार आहे. काही ठिकाणी आरटीपीसीआर पद्धतीची वैद्यकीय चाचणी; तर उर्वरित ठिकाणी अॅंटीजेन (Antigen) आधारित वैद्यकीय चाचणी उपलब्ध असणार आहे.

कोरोना चाचणी झाली आणखी स्वस्त! काय आहेत नवीन दर?

या 244 ठिकाणांची माहिती http://stopcoronavirus.mcgm.gov.in या वेबसाईटवरुन आणि विभागीय हेल्पलाईनद्वारे किंवा 1926 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोविडची लक्षणे असल्यास वरील क्रमांकावर संपर्क साधून मुंबईकरांना आपल्या घराजवळच मोफत कोरोना चाचणी करता येणार आहे. सुरुवातीला दररोज सकाळी 10 ते 12 या कालावधीदरम्यान या 244 ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचणी सुविधा 'वॉक इन' पद्धतीने उपलब्ध असणार आहे.

महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या 244 ठिकाणांव्यतिरिक्त महापालिका क्षेत्रातील 54 खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्येही या आधीपासूनच कोरोना चाचणी मोफत उपलब्ध आहे. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील कोविड विषयक वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध असणाऱ्या ठिकाणांची एकूण संख्या ही 300 पेक्षा अधिक झाली आहे.

खासगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचणीच्या दरात कपात कोरोनाची चाचणी आता आणखी स्वस्त झाली आहे. खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचणीत 200 रुपयांची कपात करण्यात आली आहे. कोरोनाच्या चाचणीसाठी आता जास्तीत जास्त अठराशे रुपये मोजावे लागणार आहे. कोरोना चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळेत स्वॅब दिल्यास 980 रुपये आकारले जाणार आहेत. कोविड केअर सेंटर्स, हॉस्पिटल, क्लिनिक, क्वॉरंटाईन सेंटर्समध्ये स्वॅब दिल्यास 1400 रुपये आकारले जाणार आहेत. तर घरी येऊन स्वॅब घेतल्यास 1800 रुपये आकारले जाणार आहेत. या नव्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 26 ऑक्टोबर रोजी ट्वीट करुन ही माहिती दिली होती.

Free COVID-19 Test | मुंबईत आजपासून 244 ठिकाणी कोरोनाची मोफत चाचणी; BMCचं मोठं पाऊल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Naik : या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
Ishan Kishan: इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!

व्हिडीओ

Special Report Raut VS Thackeray : राऊतांचे ठाकरेंनाच रोखठोक सल्ले, कार्यपद्धतीवर राऊतांना प्रश्न?
Special Report Mahayuti On Satara ZP :दोघांचही लक्ष्य सातारा झेडपीचा अध्यक्ष, साताऱ्याचं समीकरण काय?
Special Report Harshwardhan Sapkal : पुण्यात घमासान , पुण्यात भाजप वि.काँग्रेस संघर्ष पेटला
Ind vs Pak Live Update : पाकिस्तान संघाने जिंकली नाणेफेक, सूर्याचा मोठा निर्णय
Sharad Ponkshe on Muslim : प्लंबर असो वा सुतार, हिंदूच हवा, शरद पोंक्षेंचे वादळी विधान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Naik : या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
Ishan Kishan: इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
Pune BJP Congress Rada: पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
Ishan Kishan: संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
Bangladesh Election Result 2026: इकडं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात अन् तिकडं तारिक रहमान यांच्या शपथविधीला पीएम मोदी बांगलादेशला जाणार की नाहीत?
इकडं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात अन् तिकडं तारिक रहमान यांच्या शपथविधीला पीएम मोदी बांगलादेशला जाणार की नाहीत?
Embed widget