एक्स्प्लोर
रिलायन्सचा 13 हजार 251 कोटींचा विद्युत व्यवसाय अदानींकडे
12 हजार 101 कोटी रुपये संपत्तीची किंमत असून तर 1 हजार 150 कोटी रुपये रेग्यूलेटरी अप्रूव्हलसाठी देण्यात आले आहेत.

मुंबई : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रा कंपनीने आपला वीज प्रकल्प विक्रीत काढला आहे. अदानी ग्रुपसोबत 13 हजार 251 कोटी रुपयांचा सौदा झाल्याची माहिती रिलायन्स इन्फ्राने दिली आहे.
रिलायन्स एनर्जी हा कंपनीचा विद्युत व्यवसाय अदानी ग्रुपच्या अदानी ट्रान्समिशन लिमिटेडला विकण्यात आला आहे. विजेची निर्मिती करण्यापासून ट्रान्समिशनपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश यात होतो.
12 हजार 101 कोटी रुपये संपत्तीची किंमत असून तर 1 हजार 150 कोटी रुपये रेग्यूलेटरी अप्रूव्हलसाठी देण्यात आले आहेत.
5 हजार कोटी रुपयांचं रेग्युलेटरी असेट आणि 550 कोटी रुपयांचं वर्किंग कॅपिटल रिलायन्स इन्फ्राकडेच राहील. रिलायन्सच्या एकूण विद्युत व्यवसायाची किंमत 18 हजार 800 कोटी रुपयांच्या घरात आहे.
या प्रकल्पाच्या विक्रीतून आलेला पैसा कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी वापरण्यात येईल, असंही रिलायन्स इन्फ्रातर्फे सांगण्यात आलं. रिलायन्स एनर्जीचे मुंबईत एकूण 30 लाख घरगुती आणि व्यावसायिक ग्राहक आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
नाशिक
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
